माढा विधानसभेची रणजीतसिंह मोहिते पाटील तर माळशिरस विधानसभेची धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे निवडणूक प्रमुख जबाबदारी….
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील 288 मतदार संघाचे निवडणूक प्रमुख जबाबदारी जाहीर केली आहे.
मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्यातील 288 मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे विधानसभा मतदारसंघ निहाय निवडणूक प्रमुखाच्या नियुक्ती त्यांची यादी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये 245 माढा मतदारसंघाची जबाबदारी विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे तर 254 माळशिरस अनुसूचित जाती या मतदार संघाची जबाबदारी भाजपचे संघटन सरचिटणीस धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवलेली आहे.
महाराष्ट्रातील 288 मतदार संघाचे निवडणूक प्रमुख नियुक्त केलेले आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 244, करमाळा गणेश चिवटे 245, माढा रणजीतसिंह मोहिते पाटील 246, बार्शी रणवीर राऊत 247, मोहोळ अनुसूचित जाती सुनील चव्हाण 248, सोलापूर शहर उत्तर राजकुमार पाटील 249, सोलापूर शहर मध्य सौ. कांचना यन्नम 250, अक्कलकोट राजकुमार झिंगाडे 251, दक्षिण सोलापूर हनुमंत कुलकर्णी 252, पंढरपूर राजेंद्र सुरवसे 253, सांगोला चेतनसिंह केदार सावंत 254, माळशिरस अनुसूचित जाती धैर्यशील मोहिते पाटील अशी मतदार संघातील निवडणूक प्रमुख पदाच्या निवडी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng