माया फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमाने बारामतीकर भारावले
बारामती (बारामती झटका)
साधना करिती तुझी जे
नित्य तव सहवास दे…
धमण्यातल्या रुधिरास या
खल भेदण्याची आस दे…
सन्मार्ग आणि संन्मती लाभो सदा सत्संगती,
नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती…
पंखास या बळ दे नवे,
झेपावण्या आकाश दे…
जे सत्य सुंदर सर्वथा जन्म,
त्याचा ध्यास दे…
माया फाउंडेशनची स्थापना एक वर्षापूर्वी झाली. या संस्थेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम चालू असतात. यामध्ये रक्तदान, वारकऱ्यांना मोफत अन्नदान, वृक्षारोपण अशा अनेक सामाजिक उपक्रमामार्फत या संस्थेचे कार्य चालू आहे.
सर्वांनी समर्पण भावनेतून केलेल्या सामूहिक प्रयत्नातून माया फाऊंडेशनचा एक वर्षाचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. गुढीपाडव्याचे औचित्य साधून निवासी मूकबधीर विद्यालय कऱ्हावागज, ता. बारामती, जि. पुणे येथील विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारण जीवनावश्यक लागणारा किराणा फाउंडेशनकडून देऊन गुढीपाडवा साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
यावेळी निवासी मूकबधिर विद्यालयाच्या सौ. रामेश्वरी जाधव मॅडम यांचा सन्मान करण्यात आला व “यिन सकाळ समूहाच्या” पुणे जिल्ह्याच्या महापौरपदी मा. प्रणवराज तानाजी मिटकल सावंत यांची निवड झाल्याबद्दल माया फाउंडेशनकडून त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी माया फाऊंडेशनचे संस्थापक योगेश लक्ष्मण गेंड, अध्यक्ष तुषार तानाजी बोकफोडे, उपाध्यक्ष विजय तुकाराम करे, सचिव राज हनमंत मदने, खजिनदार ऋषिकेश हनुमंत वनवे यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य
प्रतिक करे, राहुल सावंत, सुनिल भानवसे, अक्षय जाधव,
ओंकार पालवे, कृष्णा डोंगरे, पै. संग्राम टेळे, अजय येडगे, संदीप सरगर, पै. रणजित वलेकर, पै. अनिलराव वाघमोडे, राहुल केंगार, किरण काळे, स्वप्निल देशमुख, पै. राजकुमार वाघमोडे, सुदर्शन गायकवाड, शैलेश गोसावी, पै. प्रणवराज मिटकल सावंत, नारायण पिसे, नागेश काळेल व मित्रपरिवार उपस्थित होता.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng