तहसील, प्रांत, जिल्हाधिकारी कार्यालयात बेकायदेशीर खडीक्रेशर रसद मिळाल्याने अधिकारी सुस्त, तर खडी क्रेशर चालक-मालक मस्त…

महसूल प्रशासनातील अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंधाने हात बरबटलेले असल्याने कारवाई करताना हात निसटत आहेत…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील अनाधिकृत व बेकायदेशीर खडी क्रेशर रात्रंदिवस बेसुमार सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असताना तहसील, प्रांत व जिल्हाधिकारी कार्यालयात बेकायदेशीर खडी क्रेशर यांची रसद मिळत असल्याने अधिकारी सुस्त तर खडी क्रेशर चालक-मालक मस्त, महसूल प्रशासनातील अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंधाने हात बरबटलेले असल्याने कारवाई करताना हात निसटत आहेत. अशी अवस्था झालेली असल्याने माळशिरस तालुक्यातील त्रस्त जनतेमधून चर्चा सुरू आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तहसील प्रांत व जिल्हाधिकारी कार्यालयात बेकायदेशीर खडी क्रेशरची वसुली करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बडतर्फ करून बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चाप बसवावा, अशी सर्वसामान्य व सुज्ञ नागरिकांमधून चर्चा सुरू आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यासाठी स्वतंत्र प्रांत कार्यालय व तहसील कार्यालय आहे. सदरच्या ठिकाणी सर्वच्या सर्व जागा भरलेल्या आहेत. मंडल अधिकारी व तलाठी यांच्या सुद्धा नेमणुका आहेत. तरीसुद्धा, अनाधिकृत व बेकायदेशीर खडी क्रेशर सुरू आहेत, याकडे डोळे झाक का ?, असा सवाल जनतेमधून उपस्थित केला जात आहे. माळशिरस तालुक्यातील अनाधिकृत खडी क्रेशरची माहिती तहसील कार्यालयाकडून मिळालेली आहे. माळशिरस तालुक्यात कागदोपत्री खडी क्रेशर बंद मात्र, अनाधिकृत बेकायदेशीर धुरळा उडवत खडी क्रेशर धुमधडाक्यात सुरू आहे. यामध्ये आर्थिक साटेलोटे मोठ्या प्रमाणात असल्याने खुमासदार चर्चा सुरू आहे. आर्थिक हितसंबंध असल्याशिवाय राजरोसपणे रात्रंदिवस अनाधिकृत बेकायदेशीर खडी क्रेशर सुरू आहेत.
अनाधिकृत खडी क्रेशरची यादी गट क्रमांकासह तहसील कार्यालयाकडून मिळालेली आहे. तहसील कार्यालयाकडे नोंद नसणारे किती खडी क्रेशर असतील, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचीही जाणीवपूर्वक डोळेझाक होत आहे का ?, आर्थिक महसूल जमा झालेला पोहोच होत आहे का ?, असाही प्रश्न समाज माध्यमातून उपस्थित केला जात आहे. याकडे पालकमंत्री यांनी लक्ष द्यावे.
तलाठी मंडल अधिकारी, तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी यांना अनाधिकृत व बेकायदेशीर खडी क्रेशरकडे लक्ष देण्यास वेळ नाही. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या बेकायदेशीर गोष्टीकडे लक्ष देतील का ?, अशीही बेकायदेशीर व अनाधिकृत खडी क्रेशर सुरू असल्याने सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास होत असल्याने त्रस्त व संतप्त जनतेमधून उलट सुलट चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.