माळशिरस तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते ॲड. सुभाषआण्णा पाटील यांनी माळशिरस विधानसभेचे आ. राम सातपुते यांची सांत्वनपर भेट घेतली.
मांडवे (बारामती झटका)
अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष भाजपचे माळशिरस तालुक्यातील जेष्ठ नेते ॲड. सुभाषआण्णा पाटील यांनी माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांची माळशिरस तालुक्यातील मांडवे 50 फाटा येथील श्रीराम निवासस्थान येथे शुक्रवार दि. 30 जून 2023 रोजी सायंकाळी 06 वाजता सांत्वनपर भेट घेतली.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे सोमवार दि. 26/06/2023 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी दुःखद निधन झालेले होते. त्यांच्यावर मूळगावी डोईठाण, ता. आष्टी, जि. बीड, येथे अंतिम संस्कार करण्यात आलेले होते. सर्व विधी क्रियाकर्म करून शुक्रवार दि. 30/06/2023 रोजी सर्वांना भेटीसाठी माळशिरस मतदारसंघात उपलब्ध झालेले आहेत.


अहिल्यादेवी अहिराणी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष व माळशिरस तालुक्यातील भाजपचे जेष्ठ नेते ॲड. सुभाषआण्णा पाटील यांनी स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नीरा देवधर संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष व भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng