माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाला लागली घरघर
माळशिरस तालुक्यातील नेते व कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर भाजपच्या कमळाकडेही वाटचालीची दिशा सुरु
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्रामध्ये देशाचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार, विद्यमान विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, माजी जलसंपदा मंत्री व प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील, संसदपटू खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाची टिकटिक वाढत असताना माळशिरस तालुक्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाला घरघर लागली आहे. माळशिरस तालुक्यातील नेते व कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर व भाजपच्या कमळाकडेही वाटचालीची दिशा सुरू आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचे काटे संथ गतीने सुरू आहेत.


महाराष्ट्रामधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन नव्याने शिवसेनेतून बंड केलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे महाराष्ट्रात सरकार आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना नव्याने केलेली आहे. सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्याकडे जबाबदारी आहे. माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राजाभाऊ हिवरकर पाटील यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेचे तालुका अध्यक्ष पद घेतलेले होते. माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादीतूनच शिवसेनेत जाण्यास सुरुवात झालेली होती. आरोग्यमंत्री नामदार तानाजीराव सावंत यांनी पहिल्यांदा दौरा माळशिरस तालुक्याचा केलेला होता. त्यामुळे माळशिरस तालुक्यात अनेक नेते व कार्यकर्ते शिवसेनेच्या संपर्कात आलेले होते.


माळशिरसचे माजी नगरसेवक संतोष आबा वाघमोडे यांनी शिवसेनेत प्रवेश करून सोलापूर जिल्हा उपप्रमुख पदी निवड झालेली आहे. युवा सेनेच्या सोलापूर जिल्हा प्रमुख पदी प्रसन्नजीत घुले युवा सेनेच्या माळशिरस तालुका प्रमुख पदी बापूराव सरक यांची निवड करण्यात आलेली आहे. माळशिरस तालुक्याच्या विरोधी गटातील राजकारणामध्ये वाघमोडे घुले सरक यांचे मोठे योगदान आहे. सरक मामा म्हणून सुपरीचित असलेले भांबुर्डी गावचे सुपुत्र आहेत. माळशिरस तालुक्याच्या कानाकोपऱ्यात त्यांची वेगळी ओळख आहे. बापूराव सरक यांचेही युवकांचे संघटन जोरात आहे. जनसंपर्क दांडगा आहे. भविष्यात शिवसेनेमध्ये अनेक राष्ट्रवादीचे पदाधिकारी नेते व कार्यकर्ते सोबत घेणार असल्याचे बोलले जात आहे. माजी नगरसेवक संतोष आबा वाघमोडे यांनी सुद्धा माळशिरस नगरपंचायतमध्ये आरक्षित जागेवर सौ. मंगलाताई गेजगे यांना निवडून आणून स्वतःची ताकद दाखवून दिलेली आहे. प्रसन्नजीत घुले माळशिरस तालुक्याच्या राजकारणामध्ये मोठे घराणे असलेल्या घराण्यातील युवक प्रसन्नजीत घुले शिवसेनेत गेलेले असल्याने त्यांचीही ताकद शिवसेनेसाठी वाढणार आहे. गतवेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत वाघमोडे घुले, सरक होते. सध्या शिवसेनेत गेलेले असल्याने राष्ट्रवादीची ताकद कमी झालेली असून माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाला घरघर लागली असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng