माळशिरस नगरपंचायतमधील रेश्मा टेळे यांचे नगरसेवका पद अपात्र करा,नगरसेवक विजय देशमुख यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस नगरपंचायतमधील नगरसेविका रेश्मा सुरेश टेळे यांचे नगरसेवक पद अपात्र करण्याकरता त्यांच्या विरोधात नगरसेवक विजय बाजीराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे. विजय बाजीराव देशमुख यांच्या वतीने ॲड. दत्तात्रय जगन्नाथ घोडके व ॲड. सचिन नानासाहेब भांजी तुळजापूर हे काम पाहत आहेत.
नगरसेवक विजयराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीमध्ये असे नमूद करण्यात आले आहे कि, माळशिरस नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक 2021-22 मध्ये पार पडली. त्यामध्ये रेश्मा टेळे या महाराष्ट्र विकास आघाडी या पक्षाच्या नगरपंचायत सदस्य म्हणून राज्य निवडणूक आयोगाने प्रमाणपत्र दिले म्हणजेच त्या महाराष्ट्र विकास आघाडी या पक्षाच्या नगरसेविका होत्या. परंतु त्यांनी नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला व त्या अनुषंगाने वेगवेगळ्या कार्यालयात नवनिर्माण सेना या पक्षाच्या नगरसेविका म्हणून त्यांनी काही तक्रारी तथा काही निवेदने दिलेली आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हलगी नाद आंदोलने देखील माळशिरस नगर पंचायत पुढे केलेले आहेत. या सर्व बाबी विचारात घेता त्यांनी त्यांचे मूळ पक्ष महाराष्ट्र विकास आघाडीचा शैक्षणिक त्याग केला असल्याने महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता या कायद्याचा भंग केल्याने त्या नगरसेविका म्हणून राहण्यास अपात्र ठरतात. म्हणून त्यांचे विरुद्ध विजय बाजीराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे दि. 22/12/2022 रोजी तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me? https://www.binance.info/de-CH/join?ref=PORL8W0Z