माळशिरस येथे तालुकास्तरीय पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण संपन्न…
माळशिरस (बारामती झटका)
आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण, छोटे छोटे लघू उद्योजक निर्माण करणे, चालू उद्योग क्षमता व बाबी वाढविणे, आधूनिक यंत्रसामुग्री वापर, सामुदायिक सुविधा निर्माण करणे, ब्रॅडीग करणे, कृषि अन्न प्रक्रियेला चालना देणे, कृषि अन्न मुल्यवर्धन करण्यासाठी तालुकास्तरीय पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया प्रशिक्षण तालुका कार्यालयात दि. ३० ऑगस्ट रोजी संपन्न झाले. यासाठी अधिकारी, कर्मचारी, स्वयंसहाय्यता गट’ आत्मा गट, कृषि उत्पादक कंपनी व वैयक्तिक लाभार्थी असे एकूण १०२ लाभार्थी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाची प्रस्तावना करताना श्री. सतिश कचरे यांनी या योजनेच महत्व व या अंतर्गत येणाऱ्या ८० प्रकारच्या उद्योगाची माहीती दिली. प्रशिक्षणात सौ. काजल म्हात्रे विषय तज्ञ कृषि विज्ञान केंद्र मोहोळ यांनी सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग व यासाठी असणाऱ्या प्रशिक्षण सुविधांबाबतची माहिती दिली. जिल्हा रिसोर्स पर्सन डी. आर. पी. श्री. समाधान खुपसे यांनी या योजनेच्या मार्गदर्शक सुचना, अटी, नियम, कार्यपध्दती वैयक्तिक, गट, कंपनीसाठीचे प्रक्रिया उद्योग, सामुदायीक सुविधाबाबत महिती देऊन उपस्थिताचे शंका निरासन केले. श्री. रणजीत शेंडे व्यवस्थापक माविम, यांनी स्वयंसहायता गट व बीज भांडवलबाबत चर्चा केली.

तसेच श्री. विक्रांत माने देशमुख चार्टड अंकाऊटंट, यांनी प्रकल्प अहवाल बनविण्याबाबत लागणारी कागदपत्रे व प्रकल्प अहवालाबाबत माहिती दिली. श्री. सतीश कचरे प्र. तालुका कृषि अधिकारी, यांनी योजना उद्योग कर्ज व सीबील व ते वाढविण्याचे पर्यायबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सर्जेराव तळेकर उपविभागीय कृषि अधिकारी पंढरपुर यांनी अनुदानासाठी उद्योग न उभारता छोटे छोटे क्रय कर्ज शक्तीप्रमाणे उद्योग निवड करून छोटे छोटे रक्कम प्रकल्प अहवाल व अभ्यास करून बँक आधिकारी यांच्याशी संपर्क केला तर यातील बँक कर्ज प्रकरणे मंजूरी प्रमाण वाढेल याबाबत सुचना दिल्या.
कार्यक्रमात २ स्वयंसहायत्ता गट, १ कृषि उत्पादन कंपनी व ४७ वैयक्तिक लाभार्थीचे अर्ज विविध सुक्ष्म उद्योगासाठी प्राप्त झाले. ते डी.आर.पी. श्री. समाधान खुपसे यांचेकडे पुढील कार्यवाही साठी देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. भागवत शिंदे कृस यांनी केले व आभार प्रर्दशन श्री. अनिल फडतरे कृस पिलिव यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता या योजनेचे मार्गदर्शक सुचना, उद्योग यादी, कागदपत्रे माहिती, योजना फॉर्म वाटप, चहापान व उल्पोपहाराने झाली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

