Uncategorizedताज्या बातम्या

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी युवा उद्योजक दिनेश धाईंजे यांचा सन्मान केला.

दिनेश धाईंजे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी निवड व वकिलीची एलएलबी डिग्री पूर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला

माळशिरस ( बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या वतीने भारतीय जनता युवा मोर्चाचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष पदी निवड व वकिलीक्षेत्रात एलएलबी डिग्री संपादन केलेले युवा उद्योजक दिनेश शेठ धाईंजे यांचा सन्मान माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आला. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, भारतीय जनता पार्टीचे नातेपुते शहराध्यक्ष भैय्यासाहेब चांगण, नातेपुते नगरपंचायतीचे कर्तव्यदक्ष नगरसेवक दीपक काळे, युवा नेते राहुल रुपनवर, इम्रान नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते.

माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह येथे उद्योजक दिनेश शेठ धाईंजे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली होती‌. यावेळी के. के. पाटील भाजपा जिल्हा सहप्रभारी, सोपान नारनवर जिल्हा उपाध्यक्ष, बाळासाहेब सरगर जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा, हनुमंतराव सूळ, बाळासाहेब वावरे, बी. वाय. राऊत, मुक्तार कोरबू, बाळासाहेब लवटे पाटील, संदीप पाटील, लक्ष्मण गोरड, तालुका संघटन सरचिटणीस संजयजी देशमुख, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दादासाहेब खरात, उद्योजक दत्तात्रय शेळके, लक्ष्मण माने, राहूल मदने, राजेंद्र वळकुंदे, उद्योजक सतीशतात्या ढेकळे, हनुमंत कर्चे, भैय्यासाहेब चांगण, युवा नेते मनोज जाधव, सुनील बनकर, युवराज वाघमोडे, बलभीम जाधव, मिनीनाथ मगर, लाला साळवे आदींसह तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात यांनी माळशिरस शहरातील युवा नेते दिनेश धाईंजे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले होते.
दिनेश धाईंजे यांनी कमी वयामध्ये उद्योग व्यवसायात गरुड भरारी घेतलेली आहे. सिद्धिविनायक डेव्हलपर्स ग्रुपच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यात बिगर शेती प्लॉटची विक्री करून सर्वसामान्य जनतेच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर अनेक ठिकाणी प्लॉट्स विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. दिनेश यांचे संघटन कौशल्य चांगले आहे. त्यांचा माळशिरस परिसरात जनसंपर्क दांडगा आहे. लहानपणापासून उद्योग व्यवसायाबरोबर राजकारण व शिक्षणाची आवड आहे. मूर्ती लहान पण कर्तुत्व महान असणारे दिनेश यांच्यामध्ये राजकारणातील व समाजकारणातील गुण आहेत. उच्चशिक्षित व उद्योग व्यवसायामध्ये नाव असलेले दिनेश धाईंजे यांच्यामुळे माळशिरस शहरात व तालुक्यात भारतीय जनता पक्षाला अच्छे दिन येणार आहेत. त्यांच्या निवडीने मित्रपरिवार व नातेवाईक यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्व परिचित असणारे सर्व गुणसंपन्न दिनेश धाईंजे यांच्यावर शुभेच्छांचा सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू होता.

एलएलबी डिग्री पूर्ण केलेली असल्याने त्यांच्या शिक्षणाचा भारतीय जनता पक्ष वाढीसाठी फायदा होणार असल्याने माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी त्यांचा सन्मान करून भावी कारकीर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort