Uncategorized

माळशिरस शहरातील राजमाता अहिल्यादेवी चौकातील माय लेकराच्या “एकदम कडक” स्पेशलने अनेकांना वेध लावले…

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार यांनी सुद्धा जनतेत लोकप्रिय असणाऱ्या माय लेकराच्या “एकदम कडक स्पेशल” चा आस्वाद घेतला.

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस नगरपंचायत हद्दीतील पुणे पंढरपूर पालखी महामार्ग व अकलूज माळशिरस म्हसवड रोडवर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चौकातील एकदम कडक स्पेशल चहाने अनेक चहा पिणाऱ्या धारकांना वेध लावलेले आहे‌. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनीसुद्धा ग्राहक व जनतेत लोकप्रिय असणाऱ्या कडक स्पेशल चहाचा आस्वाद घेतलेला आहे.

माळशिरस शहरातील अनिल नवगण परिवार यांनी एकदम कडक स्पेशल व अद्वैत स्नॅक्स सेंटर सुरू केलेले आहे. सध्या बाजारामध्ये अनेक रेसिपीच्या फ्रेंचीशी घेऊन व्यवसाय करीत आहेत. मात्र, आकाश अनिल नवगण व सौ. प्रतिभा अनिल नवगण या माय लेकरांनी स्वतःच्या हाताने ग्राहकांना व चवीने चहा पिणारा अभिनव असा चहा देऊन थोड्याच दिवसांमध्ये जनतेच्या जिभेवर एकदम कडक स्पेशलची चव अधिराज्य करीत आहे.

चहा म्हटलं की दूध, साखर, पाणी, चहापत्ती या चार वस्तू महत्त्वाच्या असतात. मात्र, बनवण्याची पद्धत यावर चव ठरत असते. सुशिक्षित असणाऱ्या आकाश यांनी ग्राहकांना पसंत असणाऱ्या चहाची चव ओळखली आणि चहा करण्याची पद्धत वेगळी असल्याने चहामध्ये चव व वेगळीच गोडी चहाला असल्याने दिवसेंदिवस चहा पिणाऱ्या ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. म्हसवड, माळशिरस व पुणे पंढरपूर दोन्हीही रोडच्या कडेला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चौकामध्ये त्यांनी स्वतःच्या जागेमध्ये सुरू केलेल्या व्यवसायास कष्ट व मेहनतीच्या जोरावर मायलेकरांनी व्यवसायामध्ये प्रगती केली आहे. एकदम कडक स्पेशल चहा पिण्याकरता माळशिरस शहरातील व कामानिमित्त शहरांमध्ये इतर गावातून आलेले लोक खास करून कडक स्पेशल चहाचा आस्वाद घेण्याकरता आवर्जून येत असतात.

माळशिरस ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर दिवसेंदिवस माळशिरस शहराचा चेहरा मोहरा बदलत आहे‌. गावाचा विकास होत आहे. माढा लोकसभेचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, विधानसभेचे आ. राम सातपुते यांच्या सहकार्याने माळशिरस नगर पंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी माळशिरस शहरांमध्ये असणाऱ्या अडचणींसाठी निधी उपलब्ध करून गावामध्ये रस्ते, गटारी, पाणी, लाईट अशा मूलभूत सुविधांबरोबर व्यावसायिकांना व्यवस्थित व्यवसाय करता यावा यासाठी सुद्धा माळशिरस शहरात दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. माळशिरस शहरामध्ये तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय, भूमी अभिलेख, न्यायालय अशी शासकीय कार्यालये असल्याने दैनंदिन तालुक्यातील जनतेची कामानिमित्त ये-जा सुरू असते. माळशिरस पंचक्रोशीच्या आसपासच्या वीस ते पंचवीस गावातील लोक काम असो अगर नसो माळशिरसला फेरफटका मारल्याशिवाय अनेकांना करमत नाही, असे माळशिरस दिवसेंदिवस गजबजू लागले आहे. माळशिरस शहरात अहिल्यादेवी चौकात नेहमी वर्दळ असते. अशा ठिकाणी माय लेकरांच्या एकदम कडक चहाने चौकात गर्दी वाढवलेली आहे. एक वेळ चहा पिणारा माणूस पुन्हा चहा पिण्याकरता आवर्जून येत असतो. एकमेकांच्या सांगण्यावरून चहाची महती दिवसेंदिवस वाढत आहे. ग्राहकांना चांगली सेवा देण्याकरिता माय लेकरे यांचा आटापिटा सुरू असतो. किती जरी गर्दी असली तरीसुद्धा सर्वांना विनम्रपणे सेवा देण्याचे काम सुरू असते. माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते हेसुद्धा एकदम कडक स्पेशल चहाचा आस्वाद घेण्याकरता आवर्जून आलेले होते. त्यांच्यासोबत भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व नीरा देवधर समितीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सरगर सोबत होते. नवगण परिवार यांनी लोकप्रिय दमदार आमदार यांचा सन्मान केला. त्यावेळी दिव्या फोटोग्राफीचे मालक शशिकांत म्हमाणे यांनी तो क्षण टिपलेला होता.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button