डोंगर पोखरून उंदीर काढला….

दोन मटका एजंटकडून दोन हजार रुपये जप्त…
रोज लाखो रुपयांची बुक्की घेणारे बुक्कीमालक मात्र मोकाट !!!!
करमाळा (बारामती झटका)
करमाळा पोलिसांनी काल कंदर येथून एका साठवर्षीय वृद्धाला पकडून त्याच्याकडून मटका नावाचा जुगार घेताना एक हजार रुपये एक वही व बॉलपेन जप्त केला. तसेच करमाळा शहरातील राजू दत्तात्रय धुमाळ यांच्याकडून 950 रुपये एक वही जप्त केली. या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या दमदार व धाडसी कारवाईचे नागरिकांतून स्वागत होत असले तरी जे मटका बुक्की चालक करमाळ्यातील रोज लाखो रुपयांचा मटक्याचा धंदा घेतात. ज्यांच्या हाताखाली दोन-दोनशे मटका एजंट गोरगरीब काम करतात. या बुक्की चालकांवर गुन्हा दाखल करण्याचे धाडस पोलीस का दाखवत नाहीत, असा अर्थपूर्ण सवाल नागरिकांतून होत आहे.
करमाळ्यात मटका बुक्की चालकांचे पेव फुटले असून करमाळ्यातील जेऊर, जिंती, पारेवाडी, साडे, सालसे, घोटी या अनेक ठिकाणाहून बुक्कीएजंट मोबाईलद्वारे मटका घेतात, हे उघड सत्य आहे. केवळ दोन किरकोळ हातावरचे पोट असलेल्या गोरगरीब मटका एजंटला पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे व आपली पाठ थोपटून घेणे हा पोलिसांचा प्रकार सध्या करमाळ्यात चर्चेचा विषय ठरला आहे!!
काही मटकाबुक्की चालक आपल्या विरोधातील बुक्की मालकाला अडचणीत आणण्यासाठी खाकीला हाताशी धरून ठराविक एजंटवर गुन्हा दाखल करत आहेत का ?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तालुक्यात गोरगरीब पानपट्टी, टपरी अशा ठिकाणावर स्वतःचा प्रपंच चालविण्यासाठी किरकोळ मटका घेणारे 400 ते 500 एजंट आहेत. यांचे मालक असणारे बुकिंग चालक मात्र मोकाट आहेत. आम्हाला केस दाखवायचे आहेत अशा नावाखाली ही काही गोरगरीब मटका एजंटवर विनाकारण गुन्हे दाखल करत असल्याची चर्चा आहे.
धाडसी पोलीस निरीक्षक म्हणून ख्याती असलेले ज्योतीराम गुंजवटे आता किरकोळ गोरगरीब एजंट पकडण्यापेक्षा बुक्की मालकालाच अटक करून आपला धाडसीपणा दाखवणार का ?, असा प्रश्न गोरगरीब मटका एजंटकडून विचारला जात आहे. या मटक्यात अनेक व्यापाऱ्यांची मुले गुरफटली असून त्यांचे प्रपंच देशोधडीला लागले आहेत. या मटका विरोधात कोणाचे बोलायचे धाडस होते का ?, हे पाहणे आता गरजेचे ठरणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.