Uncategorizedताज्या बातम्याशैक्षणिक

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला झटका, बोगस ५२ शिक्षक केले निलंबित,

विभागीय चौकशी पूर्ण होताच बडतर्फीची कार्यवाही होणार

बीड (बारामती झटका)

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी जिल्हाअंतर्गत बदलीसाठी आपले अर्ज दाखल केले होते. मात्र, संशय बळावल्याने संवर्ग एक मधून अर्ज केलेल्या ३३६ शिक्षकांची झेडपीत वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर या शिक्षकांना पुनर तपासणीसाठी अंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ त पाठवण्यात आले होते. ३३६ पैकी २४८ शिक्षकांची तपासणी पूर्ण झाली असून त्याचा अहवाल नुकताच मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना प्राप्त झाला. यापैकी ५२ शिक्षक बोगस निघाले. बोगसगिरी करून स्वतःची पोळी भाजणाऱ्या या शिक्षकांवर आज सीईओ अजित पवार यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच त्यांची विभागीय चौकशीही लावण्यात आली आहे. ही चौकशी पूर्ण होतात त्यांच्यावर दंडात्मक, वसुली आणि बडतर्फीची कार्यवाही केली जाणार आहे. दरम्यान पवार यांनी केलेल्या या कारवाईमुळे बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे होणाऱ्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी पहिल्या टप्प्यात बदलीपात्र शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली होती. यात १५७२ शिक्षक पात्र होते, यातील ७९४ शिक्षकांनी आपली संवर्ग एक मध्ये बसल्याबाबतचे अर्ज केले. संवर्ग एक मध्ये गंभीर आजारी, दिव्यांग अशा बाबींचा समावेश आहे. आपली बदली होऊ नये किंवा हवी ती शाळा मिळावी, यासाठी शिक्षकांकडून बोगस कागदपत्रे जोडल्याचा संशय आणि तक्रारी आल्याने सीईओ अजित पवार यांनी संबंधित शिक्षकांची सुनावणी घेतली. यात ३३६ दिव्यांग शिक्षकांना उपस्थित राहण्याबाबत नोटिसा देऊन त्यांची झेडपीत १४ डिसेंबर रोजी तपासणी करण्यात आली. दिव्यांग प्रमाणपत्राबाबत व दिव्यांगत्वाच्या टक्केवारीबाबत सदर तपासणीमध्ये पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुनर तपासणी आवश्यक असल्याचे मत नोंदविले. अशा ३३६ शिक्षकांना पुनर् तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठातांकडे (अपंग मंडळापुढे) सीईओंनी पाठवले. यातील शिक्षक, त्यांचे पाल्य, नातेवाईक ज्यांनी अपंग मंडळ अंबाजोगाई येथे दिव्यांग प्रमाणपत्रानुसार वैद्यकीय तपासणी करून घेतली, ऑनलाइन बदली प्रक्रियेच्या अर्जासोबत दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रातील टक्केवारी मध्ये व स्वारातीने दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र पुन्हा तपासणी अहवालातील दिव्यांग टक्केवारी मध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली. या तफावतीवरूनच २४८ पैकी ५२ शिक्षक बोगस असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार आज सीईओ अजित पवार यांनी ५३ शिक्षकांना तडकाफडकी निलंबित केले आहे. तसेच त्यांची विभागीय चौकशी लावली आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर बडतर्फीची कार्यवाही केली जाणार आहे. कारवाई झालेल्या बोगस शिक्षकांमध्ये धनंजय गोविंदराव फड (अंबाजोगाई, अल्पदृष्टी), रविकांत सुधाकर खेडकर (अंबाजोगाई, अस्थिव्यंग), अशोक वामनराव यादव (,अंबाजोगाई, अस्थीव्यंग), चिंतामण तुकाराम मुंडे (अंबाजोगाई, अस्थिव्यंग), राजू शंकर काळे (आष्टी, कर्णबधिर), वर्षा रामकिसन पोकळे (आष्टी, कर्णबधिर), राजेंद्र शिवाजी हजारे (आष्टी, कर्णबधिर), अमोल कुंडलिक शिंदे (आष्टी, अल्पदृष्टी), आनंद सिताराम थोरवे (आष्टी, अस्थीव्यंग), मनीषा उत्तमराव धोंडे (आष्टी, अस्थीव्यंग), देविदास भानुदास नागरगोजे (केज, अल्पदृष्टी), आसाराम पांडुरंग धेंडूळे (गेवराई, अल्प दृष्टी), रमेश ज्ञानोबा गधे (गेवराई, अल्पदृष्टी), हनुमान यशवंत सरवदे (गेवराई, अल्पदृष्टी), सुधाकर दगडू राऊत (गेवराई, अस्थीव्यंग), अरुण भीमराव चौधरी (गेवराई, अस्थिव्यंग), महादेव सखाराम जाधव (गेवराई, अस्थिव्यंग), मनोजकुमार अशोक जोशी (गेवराई, अस्थिव्यंग), मनोजकुमार मधुकर सावंत (गेवराई, अस्थिव्यंग), अनिता गोविंदराव यादव (गेवराई, अस्थिभंग), अर्चना भगवान इंगळे (धारूर, अस्थिव्यंग), शांताराम भानुदास केंद्रे (परळी, अल्पदृष्टी), मनोज नरसिंगराव सूर्यवंशी (परळी, अल्पदृष्टी), दीपक भालचंद्र शेप (परळी, अल्पदृष्टी), ज्ञानदेव नवनाथ मुटकुळे (पाटोदा, अल्पदृष्टी), गणेश भागवत ढाकणे (पाटोदा, अल्पदृष्टी), पांडुरंग आबासाहेब गवते (बीड, कर्णबधिर), शितल शहादेव नागरगोजे (बीड, कर्णबधिर), स्वाती चंद्रसेन शिंदे (बीड, कर्णबधीर), भारती मुरलीधर गुजर (बीड, कर्णबधिर), अंबिका बळीराम बागडे (बीड, कर्णबधिर), विमल नामदेव ढगे (बीड, कर्णबधिर), जीवन रावसाहेब बागलाने (बीड, कर्णबधिर), शोभा अंबादास काकडे (बीड, कर्णबधिर), वनमाला देविदास इप्पर (बीड, कर्णबधिर), आश्रुबा विश्वनाथ भोसले (बीड, अल्पदृष्टी), राजश्री रघुवीर गावंडे (बीड, अल्पदृष्टी), वाजेदा तबस्सुम मोहम्मद शफीउद्दिन (बीड, अल्पदृष्टी), शैला नागनाथ शिंदे (बीड, अल्पदृष्टी), रतन अंबादास बहिर (बीड, अल्पदृष्टी), दत्तू लक्ष्मण वारे (बीड, अस्थीव्यंग), बंडू किसनराव काळे (बीड, अस्थिव्यंग), चांद पाशा महेबूब शेख (बीड, अस्थिभंग), उज्वला अशोक जटाळ (बीड, अस्थिव्यंग), आयेशा सिद्दिका इनामदार (बीड, अस्थिव्यंग), ज्योती लहूराव मुळूक (बीड, अस्थिव्यंग), अंजली प्रभाकर भोसले (बीड, अस्थीव्यंग), गोविंद अंकुश वायकर (बीड, अस्थिव्यंग), शेख समीना बेगम शेख हमीद (बीड, अस्थिव्यंग), सुनिता भारत स्वामी (वडवणी, अल्पदृष्टी), निवृत्ती रामकिसन बेद्रे (शिरूर, अल्पदृष्टी) आणि बाळू उमाजी सुरासे यांचा समावेश आहे. दरम्यान सीईओ अजित पवार यांनी केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

बोगस शिक्षकांनी घेतलेल्या लाभाची ही चौकशी लागली
बीड जिल्ह्यात विविध विभागात अनेक धडधाकट कर्मचाऱ्यांकडून दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे बदल्या, मोक्याच्या व सोयीच्या जागा, बस प्रवासात सूट, भत्ते व इतर लाभ घेतल्याचे प्रकार सुरू आहेत. बोगस शिक्षकांनीही अशाच प्रकारे लाभ घेतले आहेत. या अनुषंगाने कोणी कोणत्या शासकीय लाभाचा कसा फायदा घेतला, यासंदर्भात चौकशीही सीईओ अजित पवार यांनी लावली आहे. या चौकशीतून जे जे बाहेर येईल त्यानुसार कारवाई होणार असल्याचे सीईओ अजित पवार यांनी सांगितले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button