Uncategorizedताज्या बातम्याशैक्षणिक

मुस्लिम मताच्या वोट बँकेसाठी दंगा भडकवणारे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आय पासून सावधान राहावे, मुस्लिम समाजाला शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन

करमाळा (बारामती झटका)

देशाची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानने स्वतःचे राष्ट्र मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित केले. भारताने सर्व धर्म समभाव जपत सर्व धर्मांना एकत्र घेऊन राष्ट्र निर्माण केले. हिंदू मुस्लिम समाजात दंगा लावून आपली मताची पोळी भाजून घेण्याचे काम आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी केले असून या जातीयवादी पक्षापासून आपण सावधान राहावे, असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

गेली पंधरा वर्षापासून करमाळा शहरातील उर्दू शाळेला नववी व दहावीचा वर्ग वाढवून मिळण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पडून होता. एकाही राजकीय नेते मंडळीला हा प्रश्न सोडवता आला नाही. मात्र राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी अवघ्या तीन महिन्यात या वर्ग वाढीला मंजुरी देऊन करमाळा शहरातील उर्दू शाळेत शिकणाऱ्या विशेषत: मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे सकल मुस्लिम समाज करमाळा तालुक्याच्यावतीने केसरकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, समाजाचे अध्यक्ष उस्मान तांबोळी, कलीम काजी, शौकत भाई नालबंद, अहमद चाचा कूरेशी, फारुख भाई जमादार, फारुख बेग, इरफान सय्यद, पत्रकार नाशिक कबीर, पत्रकार अश्फाक सय्यद, पत्रकार अलीम शेख आदी मुस्लिम समाजाचे सर्व नेते मंडळी, विकास मंडळाचे अध्यक्ष विलास घुमरे उपस्थित होते.

यावेळी बोलताना नामदार केसरकर म्हणाले की, हिंदुस्थानाच्या भूमीवर प्रेम करतो तो प्रत्येक माणूस हा भारतीय नागरिक आहे. आज मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक योजना आणल्या असून या योजना देत असताना कुठलाही जातिभेद केला जात नाही. समाजातील तरुण-तरुणींनी शिक्षण घेऊन आपली प्रगती केली पाहिजे. महाराष्ट्र सरकार सध्या दहा भाषेतून शाळा चालवत असून उर्दू शाळा तेवढीच महत्त्वाची आहे. उर्दू ही मातृभाषा असल्यामुळे समाजाच्या विद्यार्थ्यांना या भाषेचा फायदा होऊन चांगले मार्क मिळू शकतात. उर्दू शाळेतून शेवटपर्यंत शिक्षण देण्यासाठी मी प्रयत्न करणार असून आज या शाळेला वर्ग वाढ असून येणाऱ्या काळात या शाळेला शिक्षकही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले.

या उर्दू शाळेच्या वर्ग वाढीसाठी प्रयत्न करणारे मुस्लिम समाजाचे अध्यक्ष नेते इरफान भाई शेख यांनी नामदार केसरकर यांचे आभार व्यक्त केले.

गेली पंधरा वर्षांपासून आमचा हा प्रश्न प्रलंबित होता. अनेक नेते मंडळी आली गेली, अनेक शासन आले गेले, पण कोणीही आमचा प्रश्न मार्गी लावला नाही. मात्र दीपक केसरकर साहेब यांनी आमच्या भावना मुख्यमंत्री वैद्यकीय मदत पक्षाचे कक्ष मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून ऐकून घेतल्या. आमचा प्रश्न मार्गी लावला, याबद्दल आम्ही आभारी आहोत. पुढे करमाळ्यातील हिंदू मुस्लिम एकत्रितच राहणार असून उद्या येणाऱ्या बकरी ईदसाठी कुठेही आषाढी वारीमुळे कुर्बानी दिली जाणार नाही. – उस्मान शेठ तांबोळी

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button