Uncategorizedताज्या बातम्याशैक्षणिक

मोरोची येथील डॉ. निटवेज ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये पत्रकार दिन उत्साहात साजरा

नातेपुते (बारामती झटका)

मोरोची ता. माळशिरस येथील ‘दर्या प्रतिष्ठान’ संचलित “ ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, मोरोची” या शाळेत सोमवार दि. 09 जानेवारी 2023 रोजी‌ नातेपुते परिसरातील विविध वर्तमान पत्रांचे संपादक, वार्ताहर, यांचा सत्कार पत्रकार दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला नातेपुते येथिल जेष्ठ पत्रकार श्री. श्रीकांत बाविस्कर, लतिफ नदाफ यांच्याहस्ते विद्येची देवता सरस्वती आणि दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी परिसरातील संपादक, वार्ताहर, विद्यालयाचे चेअरमन डॉ. दत्तात्रय निटवे सर, प्राचार्य ताहेर शेख सर, उपप्राचार्य जिलानी आतार सर व्यासपीठावर उपस्थित होते. यानंतर उपस्थित सर्व पाहुण्यांचा विद्यालयाचे चेअरमन डॉ. दत्तात्रय निटवे सर, विद्यालयाचे प्राचार्य ताहेर शेख सर, उपप्राचार्य जिलानी आतार सर व विद्यालयातील शिक्षक यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कल महाराष्ट्र या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल श्री. श्रीकांत बाविस्कर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी लतीफ नदाफ, श्री. एन. के. साळवे, श्री. विलास भोसले, श्री. सुनिल गजाकस, श्री. प्रमोद शिंदे, श्रीनिवास कदम पाटील, श्री. आप्पासाहेब कर्चे, श्री. अभिमन्यु आठवले, श्री. हनुमंत माने, श्री. सुनिल ढोबळे, श्री. सुचित साळवे, श्री. अभिषेक मोरे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर अशी भाषणे दिली व पत्रकार कसा असावा याविषयी कविता सादर केली. यानंतर सुंदर अशा प्रकारच्या मुकनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोबाईल फोनचे दुष्परिणाम याविषयी माहिती दिली. तसेच यावेळी सहोदय CBSE इंटर स्कूल जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बुद्धीबळ, गोळा फेक, सॅक रेस, रनिंग, कबड्डी या खेळात उत्तुंग असे यश संपादन केले. त्यांचा सन्मान उपस्थित सर्व पत्रकार बंधु, डॉ. निटवे सर व शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक मा. समीर पठाण सर यांचे मार्गदर्शन लाभले.

यानंतर पत्रकारांनी मनोगत व्यक्त करताना मोबाईलचे दुष्परिणाम या मुकनाट्याचे कौतुक केले. पुढे बोलताना ते म्हणाले कि, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. जी गोष्ट तलवारीच्या जोरावर कधीच करता येत नाही ती गोष्ट पेनाने करता येते, एवढे सामर्थ्य पत्रकारीतेत आहे असे सांगितले. तसेच शाळेविषयी बोलताना ते म्हणाले, डॉ. निटवे सर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळाव्यात या उद्देशाने सर्व गोष्टींची पूर्तता केलेली आहे. माळशिरस तालुक्यातील पहिले स्केटिंग ग्राऊंड तयार करण्याचे काम त्यांनी केलेले आहे.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षीका मराठी विभाग प्रमुख सौ. सुनंदा पवार मॅडम आणि हिंदी विभाग प्रमुख श्री. गणेश राऊत सर यांनी कले. सदर कार्यक्रम विद्यालयाचे प्रिस्निपल ताहेर शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी साजरा केला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन डॉ. दत्तात्रय निटवे सर, सर्व पत्रकार बंधु व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button