युवासेना तालुका अध्यक्ष बापूराव सरक यांचा नातेपुतेकरांच्यावतीने सन्मान संपन्न…
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जननायक मामासाहेब पांढरे, माळशिरस पंचायत समितीचे विरोधी पक्ष नेते ज्ञानराज उर्फ माऊली पाटील, उद्योजक संतोषआबा पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती
नातेपुते ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे युवा सेना माळशिरस तालुका अध्यक्षपदी युवा नेते बापूराव सरक उर्फ आप्पा यांची निवड झाल्याबद्दल नातेपुतेकरांच्या वतीने सन्मान संपन्न झाला. यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जननायक मामासाहेब पांढरे, माळशिरस पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते ज्ञानराज उर्फ माऊली पाटील, युवा उद्योजक संतोषआबा वाघमोडे पाटील, युवा नेते तेजस पाटील, पप्पूशेठ दुधाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रातून शिवसेना व युवा सेना यामध्ये कर्तबगार व कार्यतत्पर युवकांची फळी मजबूत झालेली आहे. माळशिरस तालुक्यात युवानेते बापूराव सरक उर्फ आप्पा यांच्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत, सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजीराव जाधव, उपजिल्हाप्रमुख संतोष आबा वाघमोडे यांनी जबाबदारी दिलेली आहे.


बापूराव सरक यांचे युवा संघटन चांगले आहे. तरुणांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे वक्तृत्व त्यांच्यात आहे. त्यांच्याकडे युवा सेनेची जबाबदारी आल्यापासून अभिनंदनचा स्टेटस, फेसबुक, व्हाट्सअपवर रणधुमाळी उठलेली असून अनेक मित्रपरिवार यांचेकडून सन्मान सुरू आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
