Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

युवासेना शिंदे गट जिल्हा समन्वयक पदी निखिल प्रमोद चांदगुडे यांची नियुक्ती

करमाळा (बारामती झटका)

करमाळ्यातील प्रसिद्ध उद्योजक निखिल प्रमुख चांदगुडे यांची युवा सेना शिंदे गट जिल्हा समन्वयक पदी (कार्यक्षेत्र करमाळा, माढा, सांगोला) नियुक्ती झाली असून या निवडीचे पत्र जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत व युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख यांच्याहस्ते देण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, तालुकाप्रमुख देवानंदजी बागल, शहर प्रमुख संजय शीलवंत, उपशहर प्रमुख नागेश काळे, उपतालुका प्रमुख दादा थोरात, वैद्यकीय सहाय्यक डॉ. कारंडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा तालुका समन्वय दीपक पाटणे, पै. दादा इंदुलकर, शिवसेना युवा नेते विराज घाडगे, विनोद महानवर, भैरवनाथ शुगरचे अनिल दादा सावंत, उप जिल्हाप्रमुख दत्तात्रय सावंत, जिल्हाप्रमुख चरण चौरे पाटील, माळशिरस तालुका प्रमुख बाळासाहेब हिवरकर, समाधान दास आदी शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

निखिल प्रमोदभाऊ चांदगुडे हे करमाळ्यातील प्रसिद्ध उद्योजक असून रिलायन्स पेट्रोलियम लँड डेव्हलपर प्रॉपर्टी डीलर म्हणून ते कार्यरत असून त्यांचे शिक्षण सिव्हिल इंजिनिअर झाले आहे.

निखिल चांदगुडे यांचे संघटन कौशल्य करमाळा शहरात मजबूत असून याचा शिवसेना शिंदे गटाला मोठा फायदा होईल, असा विश्वास प्रा. शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केला.

हे नियुक्तीपत्र स्वीकारल्यानंतर पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने चांदगुडे यांचा सत्कार करण्यात आला.
या नियुक्तीनंतर बोलताना चांदगुडे म्हणाले की, येणाऱ्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून दिवसातील किमान अर्धा वेळ जनतेची सेवा करण्यासाठी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ देणार आहे. गरजूंना मदत करणे, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button