महाळुंग ( बारामती झटका ):
उंबरे वेळापूर ता. माळशिरस गावातील युवा नेते नाळ फाउंडेशन व महाराष्ट्र पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सुजितभाऊ अभिमान थिटे यांची भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती केलेली आहे.
सकाळ माध्यम “यिन” (यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क) “युवा वॉरिअर्स” पुरस्कार विजेते व युथ आयकॅान पुरस्कार विजेते असणारे नाळ फाऊंडेशन महाराष्ट्र व महाराष्ट्र पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आलेली असल्याने महाराष्ट्रातील पदवीधरांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झालेले आहे. ॲड. सुजितभाऊ अभिमान थिटे यांच्या अंगामध्ये संघटन कौशल्य असून अडचणीत असणाऱ्या तरुणांना योग्य मार्गदर्शन करून दिशा देण्याचे काम करीत असतात. तरुणांच्या गळ्यातील ताईत असणारे ॲड. सुजितभाऊ थिटे यांनी कार्यामधून आपली स्वतःची ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे. अशा स्वकर्तृत्व व उमद्या तरुणाला भारतीय जनता युवा मोर्चाने संधी दिलेली असल्याने या संधीचे सोने निश्चितपणे ॲड.सुजितभाऊ थिटे करतील असा विश्वास, मित्र परिवार यांना होत असल्याने मित्र परिवार यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे.
