मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना नातेपुते येथील शिक्षण संस्थेत भ्रष्टाचार व इतर आर्थिक व्यवहारात घोटाळ्याच्या चौकशीसाठी शिष्टमंडळ भेटणार..
बडा राजकीय नेता चौकशीच्या भोवऱ्यात अडकण्याची व अटक होण्याची नातेपुते परिसरात कुजबुज सुरू…
नातेपुते (बारामती झटका)
महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितांनी शिक्षण संस्था, साखर कारखाने, दूध संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, बँका, पतसंस्था यांच्या माध्यमातून राजकारण केलेले आहे. नातेपुते येथील सुप्रसिद्ध व जुन्या शिक्षण संस्थेत नोकर भरतीच्या वेळी राजकीय हेतू ठेवून नोकरी दिली जात असत. नोकर भरतीच्या वेळी भ्रष्टाचार व इतर आर्थिक व्यवहारात घोटाळ्याच्या चौकशीसाठी लवकरच शिष्ट मंडळ महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे बडा राजकीय नेता चौकशीच्या भोवऱ्यात अडकण्याची व अटक होण्याची नातेपुते परिसरात कुजबुज सुरु आहे.
महाराष्ट्रात राजकारण करीत असताना अनेक नेत्यांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजून घेतलेली आहे. सदरच्या संस्थेमध्ये नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याशी संबंधित असणाऱ्या लोकांना नोकर भरती व इतर सुविधा दिल्या जात असत. त्यामुळे राज्याचे, जिल्ह्याचे, तालुक्याचे व गावचे राजकारण करताना शिक्षण संस्थेत मोठ्या प्रमाणात अनियमितता व इतर आर्थिक व्यवहारात घोटाळे झालेले आहेत. लवकरच नातेपुते येथील शिक्षण संस्थेमध्ये नोकर भरतीची अनियमितता व इतर आर्थिक व्यवहारात घोटाळ्याच्या चौकशीसाठी शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना भेटणार आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ माजलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची स्वतःची कोणतीच संस्था नाही मात्र, अनियमितता व भ्रष्ट असणाऱ्या संस्थांवर करडी नजर राहणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.