Uncategorizedकृषिवार्ताताज्या बातम्या

लम्पी / व्हीएसडी पशूधन रोग ओळख व उपाय तांत्रीक माहिती

सौजन्य – महाराष्ट्र पशू व मत्स्य विद्यापीठ नागपूर डॉ. प्रवीन बनकर, डॉ. श्याम देशमुख, डॉ. कुलदिप देशपांडेसंकलन – श्री. सतीश कचरे, प्र. तालुका कृषि अधिकारी

माळशिरस (बारामती झटका)

पशुधन व कृषि हा अविभाज्य भाग आहे. पशुधनाशिवाय शेती अयशस्वी आहे. सेंद्रीय शेतीत तर पशुधनाचे महत्व अन्यन्य साधारण आहे. वर्तमानपत्र सोशल मिडीया न्युज चॅनेलवरील बातम्या, संदेश प्रसार व प्रचार शेतकरी वर्गात लम्पी रोगाबाबत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.यावर पशुधन शेतकरी वर्गाला माहीती देणे उचीत आहे.

रोगाची ओळख – हा देवी विषाणूजन्य चर्मरोग आहे. प्रामुख्याने संकरीत गाय व म्हैस जास्त प्रमाणात व देशी पशुधनावर कमी प्रमाणात आढळून येतो. उष्ण व दमट वातावरण या रोगास पोषक आहे. या रोगाचे प्रमाण १० ते २०% पर्यंत असून मृत्यूदर १ ते ५% पर्यत असतो. २०१९ साली प. बंगालमध्ये आलेल्या ह्या रोगाने १५ अधिक राज्यात प्रवेश केला आहे. शेळी, मेंढीमध्ये या रोगाचे प्रमाण कमी आहे.

रोगाची लक्षणे – १) शरीरावर ठळक दिसणाऱ्या १० ते २० मि.मि. गाठी दिसून येतात. २) पशुधनास ताप येणे, डोळ्यातून व नाकातून पाणी व चिकट स्त्राव येतो. ३) लाळ ग्रंथी व पायावर सुज येते, पायावरील सुज यामुळे जनावरे लंगडतात. ४) चारा कमी खातात पाणी पित नाहीत. ५) दुध उत्पादनात लक्षणीय घट. ६) रक्त तपासणीअंती पांढऱ्या पेशी कमी दिसतात ७) शरीरावरील गाठी काही प्रमाणात फुटून जखमा होतात.

रोगाचा प्रसार – प्रामुख्याने डास, माश्या, गोचीड, चिलटे, रोगबाधीत जनावरे स्पर्श, संपर्क, दुषीत चारा व पाणी पशुधन हाताळणारे व्यक्ती संपर्क, स्पर्श हताळणी यामुळे होतो.

प्रतिबंधात्मक उपाय – देवी विषाणूजन्य रोग असल्यामुळे ह्या रोगावर प्रतिबंधात्मक उपायास अतिशय महत्व आहे. १) बाधीत पशुधन वेगळे करणे व इतरांशी संपर्क येऊ न देणे. २) बाधीत पशुधन गोठा, घमेले, बादली, वाहन दुध मशिन यांचे गरम हवा, पाणी, रासायनिक निर्जंतुकीकरण करावे. ३) पशुपालकाने बाधीत जनावरे हताळणीनंतर दुसऱ्या पशुधनाचा संपर्क टाळून साबनाने हात स्वच्छ धुणे. ४) गोठ्यातील माश्या, गोचीड, पिसा, चिलटे, डास, यांचे जैविक व रासायनिक नियंत्रण करणे. ५) रोगग्रस्त जनावरे वहातूक न करणे. ६) रोगग्रस्त पशुधन बाजार संचार टाळावा. ७ ) रोगग्रस्त पशुधन मृत्यू पावलेस कमीत कमी ८ फुट खोल पुरावे. ८) नजीकचे पशुवैद्यकिय अधिकारी यांचे सल्ल्याने उपचार करावेत. ९) पशुवैद्यकिय अधिकारी यांचे सल्ल्याने शेळी व मेंढीस लम्पी प्रोवेकइंड प्रतिबंधात्मक लस टोचावी.

आयुर्वेदिक उपचार – परंपरागत उपचार आहे, जूने जाणकार लोकांकडून हा उपाय केला जातो. खायची पाने १० + १० ग्रॅम मिरे + १० ग्रॅम मीठ + गुळ गरजेनुसार यांचे मिश्रण तयार करून १) पहिल्या दिवशी प्रत्येक ३ तासांनी खाऊ घालणे. २) तदनंतर दुसऱ्या दिवशी ते दुसरा पूर्ण आठवडा दिवसातून ३ वेळा खाऊ घालणे. प्रत्येक वेळी मिश्रण ताजे तयार करून खाऊ घालावे. दूध बाजारातील वापरताना १०० डिग्री सेल्शीअस वर उकळवून तापवून वापर करावे.

तरी पशुधन शेतकरी बांधवानी वरील प्रमाणे प्रतिबंधात्मक व उपाचारात्मक उपाय करून ह्या रोगाचा प्रसार थांबविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्र. – 18002333268 वर संपर्क करावा.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button