अनंतलाल दोशी अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रत्नत्रयमध्ये नेत्र तपासणी शिबीर

सदाशिवनगर (बारामती झटका)
अनुपम आय हॉस्पिटल, अकलूज व रत्नत्रय परिवार, सदाशिवनगर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 21 ऑगस्ट 2024 रोजी रत्नत्रय इंग्लिश मिडिअम स्कूल, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मांडवे येथे रत्नत्रय परिवार, सदाशिवनगरचे सर्वेसर्वा श्री. अनंतलाल (दादा) रतनचंद दोशी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. सदर शिबीरामध्ये इ. 2 री ते 6 वी मधील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राबवण्यात आलेला हा पहिलाच कार्यक्रम आहे.
या कार्यक्रमावेळी बोलताना गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांनी स्वतः वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे, व्यवस्थित गणवेशांमध्ये उपस्थित राहणे, स्वतःबरोबर शाळा आणि शाळेचा परिसर यांचीही स्वच्छता ठेवणे, विद्यार्थी दशेमध्येच शिस्तीचे व नियमांचे पालन करणे व चांगले गुण अंगीकारणे हे विद्यार्थ्यांचे नैतिक कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन डॉ. निखिल गांधी यांनी केले.


या कार्यक्रमासाठी डॉ. निखिल महावीर गांधी (अनुपम आय हॉस्पिटल, अकलूज), रत्नत्रय परिवाराचे सर्वेसर्वा अनंतलाल (दादा )दोशी, संस्थेचे मार्गदर्शक वीरकुमार दोशी, संस्थेचे सचिव प्रमोद दोशी, संस्थेचे सदस्य बबन गोपणे, सुरेश धाईंजे, अभिजीत दोशी, अजय गांधी, दत्ता भोसले, अनुपम आय हॉस्पिटल स्टाफ मेंबर्स, मुख्याध्यापक दैवत वाघमोडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.