ताज्या बातम्यासामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अकलूज शहर काँग्रेस कमिटी, लहुजी साम्राज्य व नवनाथ भाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून संपन्न

अकलूज (बारामती झटका)

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अकलूज शहर काँग्रेस कमिटी, लहुजी साम्राज्य अकलूज, नवनाथ भाऊ साठे मित्र मंडळ यांच्यावतीने गोरगरीब मुलींना चेक वाटप, ३०० मुलामुलींना शालेय गणवेश वाटप, अकलूज नगरपरिषदेमधील महिला कामगारांना साडी वाटप, पुरुष कामगारांना ड्रेस वाटप तसेच १००० आंब्याच्या रोपांचे वाटप शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेच्या चेअरमन उर्वशीराजे मोहिते पाटील यांचे व उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना मोहिते पाटील म्हणाल्या की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिड दिवस शाळा शिकुनही उच्च कोटींचे प्रचंड असे साहित्य निर्माण केले. या साहित्यातून अत्यंत पिचलेल्या रयतेच्या हाल अपेष्टा समाजासमोर मांडल्या. जाती व्यवस्थेच्या चटक्याने ज्यांना अवघ्या दीड दिवस शाळेत शिक्षण मिळाले. पण, आपल्या लेखणीतून कष्टकरी, सर्वाहारा, उपेक्षित वर्गाच्या वेदना जगासमोर मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कॉम्रेड अमर शेख आणि लाल बावटा कलापथकाद्वारे त्यांनी प्रबोधनाचे काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. अशा थोर साहित्यिक व समाज सुधारक व्यक्तीमत्त्वाची जयंती समाजपयोगी, शिक्षण, पर्यावरण व स्वच्छतेविषयी संबंधित कार्यक्रम राबवून साजरी केली. त्याबद्दल संयोजक अकलूज शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नवनाथ भाऊ साठे व या कार्यक्रमास सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंहदादा माने पाटील, अकलूज पोलीस उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील, सुप्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार, माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सतिश नाना पालकर, अकलूज नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद गोरे, पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे अध्यक्ष माणिकराव मिसाळ, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब इनामदार, अण्णासाहेब शिंदे, भारत मगर, जनसेवा संघटनेचे सरचिटणीस सुधीर रास्ते, माळशिरस तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व गिरझणीचे उपसरपंच मयुर माने, माळशिरस बार असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, अकलूज नगरपरिषदेचे हटकर साहेब, अकलूज शहर महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष शैला गोसावी, हरि माने, रामदास माने, बाळासाहेब सोनवणे, लक्ष्मण कुंभार, सुरेश साठे, लहुजी साम्राज्यचे अध्यक्ष विजय खंडागळे, विनोद साळुंखे, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, विकास शिंदे, जाकीर शेख, रवि यादव, सचिन पाटिल, तायर मोहोळकर, ईस्माईल पटेल, नितीन खंडागळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button