लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व सौ. उर्वशीराजे मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन
अकलूज (बारामती झटका)
अकलूज ता. माळशिरस येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अकलूज शहर काँग्रेस कमिटी, लहुजी साम्राज्य अकलूज, नवनाथ भाऊ साठे मित्र मंडळ, अकलूज यांच्यावतीने दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाशेजारी, अकलूज येथे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक अकलूजच्या चेअरमन सौ. उर्वशीराजे मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
तसेच यावेळी माजी आमदार रामहरी रुपनवर, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, अकलूज पोलीस स्टेशनच्या डीवायएसपी सौ. सई भोरे पाटील, अकलूज पोलीस स्टेशनचे पीआय दीपरतन गायकवाड, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार, अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतीश पालकर यांची प्रमुख उपस्थितीत असणार आहे.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या समाज उपयोगी कार्यक्रमांमध्ये ३०० मुला मुलींना शालेय साहित्य व गणवेशाचे वाटप, अकलूज नगर परिषदेमधील महिला कर्मचाऱ्यांना साडी वाटप, अकलूज नगर परिषदेमधील साफसफाई कर्मचाऱ्यांना ड्रेस वाटप, गरीब मुलींच्या नावे ठेव पावती, ५०० आंबा वृक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng