वाघोलीच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही – जयसिंह मोहिते पाटील
वाघोली (बारामती झटका)
वाघोली ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली होती. त्या निवडणुकीमध्ये श्री खंडेराया परिवर्तन विकास आघाडीने यश प्राप्त करून ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण केले होते. दि. 15 नोव्हेंबर रोजी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांनी वाघोली ग्रामपंचायतीस भेट दिली. भेटी दरम्यान ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वृषाली योगेश माने व उपसरपंच पंडित विठ्ठल मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य योगेश माने, बळीराम मिसाळ, अमोल मिसाळ यांनी ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामास निधी मिळणे याविषयीचा प्रस्ताव जयसिंह मोहिते-पाटील यांचे समोर सादर केला. त्यावेळी इथून पुढच्या काळात वाघोली गावच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. आपले नेते आदरणीय विजयदादा, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्यातून गावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन जयसिंह मोहिते पाटील यांनी दिले.
सदर वेळी ग्रामपंचायतच्या नूतन सरपंच सौ. वृषाली योगेश माने व उपसरपंच पंडित विठ्ठल मिसाळ यांनी जयसिंह मोहिते पाटील यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार केला. तसेच रणजितसिंह ग्रामीण पत संस्थेच्या, वाघोली विकास संस्थेच्या व मराठा सेवा संघाच्या वतीने डॉ. अमोल माने, अशोक चव्हाण, राजेंद्र मिसाळ यांनीही जयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार केला.
या भेटी दरम्यान पंचायत समिती माळशिरसचे माजी सभापती रावसाहेब पराडे पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ संस्था अकलूजचे सदस्य महादेवराव अंधारे तसेच पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव माने आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायतचे सदस्य योगेश माने यांनी प्रास्ताविक करत असताना ग्रामपंचायत वाघोली व गावठाण वाड्या वस्तीवर करण्यात येणाऱ्या विकासकामाचा आढावा जयसिंह मोहिते पाटील साहेब यांचे समोर सादर केला. तो विकास करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच राज्य शासनाकडून विविध प्रकारचा निधी मिळण्यासाठी ग्रामपंचायतीस सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली व सदर मागणीचे निवेदन ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच वृषाली माने, उपसरपंच पंडित मिसाळ, सदस्य बळीराम मिसाळ, योगेश माने यांनी जयसिंह मोहिते पाटील यांना दिले. त्या निवेदनाचा विचार करून आपल्या मार्गदर्शनात जयसिंह मोहिते पाटील यांनी सर्वच प्रकारचा निधी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सहकार महर्षी कारखान्याचे संचालक सतीशराव शेंडगे, मराठा सेवा संघाचे पुणे विभाग अध्यक्ष उत्तमराव माने, पंचायत समिती माळशिरसचे माजी सभापती रावसाहेब पराडे, शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सदस्य महादेवराव अंधारे, वि.का.वी. संस्थेचे माजी चेअरमन विष्णू मिसाळ, माजी उपसरपंच कालिदास मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते सुरेश सर्जेराव पवार, माजी संचालक युवराज मिसाळ, मारुती मिसाळ, अमोल मिसाळ, संजय मिसाळ, तुषार पाटोळे, बापू मिसाळ, अमोल पाटील, भारत पाटील, सिद्धेश्वर मिसाळ आदीसह ग्रामविकास अधिकारी श्रीमती शिखरे, ग्रामपंचायतचे सदस्य सौ. छाया भारत पाटोळे, सदस्य लक्ष्मण पारसे, बळीराम मिसाळ, दिगंबर माने, पतसंस्थेचे चेअरमन डॉ. अमोल माने, विकास संस्थेचे चेअरमन अशोक चव्हाण तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचालन राजेंद्र मिसाळ यांनी केले तर, उद्योजक तुषार पाटोळे यांनी आभार मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Excellent article! The depth of analysis is impressive. For those wanting more information, I recommend this link: FIND OUT MORE. Keen to see what others think!
Really wonderful info can be found on web blog.Money from blog