शंकरराव मोहिते महाविद्यालयात एक दिवसीय राज्यस्तरीय “ॲडव्हान्सेस इन टिशू कल्चर टेकनिक्स” या विषयावर चर्चासत्र संपन्न
अकलूज (बारामती झटका)
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राज्यस्तरीय “ॲडव्हान्सेस इन टिशू कल्चर टेकनिक्स” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. सदर चर्चासत्राचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या मा. ऋतुजादेवी संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते व प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे व प्रमुख अतिथींच्या उपस्थित करण्यात आले. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सुमारे दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
सदर चर्चासत्राचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख व समन्वयक प्रा. रामलिंग सावळजकर यांनी केले. प्रमुख अतिथी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिव चे संचालक डॉ. डी. के. गायकवाड यांनी टिशू कल्चरचे कृषी क्षेत्रातील महत्त्व सांगत वनस्पतीच्या कोणत्याही एका भागापासून हजारो रोपे तयार करता येतात, याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. याप्रसंगी वनस्पतीशास्त्र विभाग व ऍग्रो केमिकल्स अँड पेस्ट मॅनेजमेंट विभागाच्या वतीने बोन्साय, कॅक्टस ,प्लांट ऑफ द डे, फ्लावर डेकोरेशन, बुके, औषधी वनस्पती, वनस्पती वरील रोग, बीज संकलन, गांडूळ खत प्रकल्प व हायड्रोपोनिक प्रकल्प इ. विषयावर प्रदर्शन भरविण्यात आले होते. सकाळसत्रामध्ये डॉ. नामदेव पाटकर यांनी टिशू कल्चर टेक्निक प्रक्रिया व त्यांचे फायदे, तोटे या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
तदनंतर डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्सचे टिशू कल्चर टेक्निकमधील महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. दुपार सत्रामध्ये माँटीप्लांटा इंडियाचे संस्थापक मा. फिरोज चिकाळे यांनी टिशू कल्चर टेक्निकची प्रात्यक्षिके करून दाखवत विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूजचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील तसेच मनोज रेळेकर, राजाभाऊ लव्हाळे, फुले साहेब, डॉ. एच. के. आवताडे, डॉ. विश्वनाथ आवड, डॉ. अपर्णा कुचेकर इ. मान्यवरांनी प्रदर्शनास भेट देऊन विभागाचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
समारोपामध्ये डॉ. आर. जी. पवार, डॉ. एम. ए. हाके यांनी चर्चासत्राबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. चर्चासत्राचा संपूर्ण आढावा प्रा. रामलिंग सावळजकर यांनी घेतला व आभारप्रदर्शन डॉ. सुभाष शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता सातपुते व प्रा. राणी पवार यांनी केले. सदर चर्चासत्र आयोजित करण्यासाठी प्रा. विक्रम कुंभार, प्रा. रोहित कुंभार, प्रा. प्रमोद घोगरे, प्रा. नंदकुमार गायकवाड, प्रा. प्रतिभा नलवडे, प्रा. ज्योती फुले, प्रा. अस्मिता माने, प्रा. स्नेहल पांढरे, श्री. युवराज मालुसरे, श्री. महेंद्र साठे, श्री. बापू कदम व श्री. मारुती गायकवाड व विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी चर्चासत्र पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng