शाळेला जागा देऊन भव्य दिव्य शाळा उभारणार – तानाजी बापू ठोंबरे
उंबरे दहीगाव (बारामती झटका)
राजकारण बाजूला ठेवून व समाजकारणात मनाचा मोठेपणा दाखवून सर्वांना अवघड वाटणारी निवडणूक शाळेच्या महत्वाच्या मुद्यावर एकतर्फी होणार असून गावाला अभिमान व नवल वाटेल असा अनेक दिवसांचा व सर्वांना अभिमानास्पद असणारा आपल्या गावातील शाळेचा श्री शंभू महादेव माध्यमिक विद्यालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय व स्वतः शाळेला जागा देण्याचा धाडसी निर्णय सरपंच पदाचे दावेदार तानाजी बापू ठोंबरे यांनी आज घेतल्याने त्यांचे सर्वांनी कौतुक केले व त्यांना गट तट विसरून शिवाजी भाऊ पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी समर्थन दिले असून गावकऱ्यांनी तानाजी बापूंना बिनविरोध सरपंच करावे. अशा धाडसी नेतृत्वास सर्वांनी पाठींबा द्यावा, अशी विनंती ही सर्वांना करण्यात आली आहे

तानाजी बापू हे विकास सेवा सोसायटीचे मा. चेअरमन असून गेल्या तीन टर्म सर्वाधिक मताधिक्याने विजयी हेट्रिक व सोसायटी पूर्ण वसुली व जास्तीत जास्त रोखे, सर्वांच्या प्रश्नासाठी वेळ देणारे, गोरगरीबांना आर्थिक, सामाजिक मदत करणारे नेतृत्व असून त्यांनी गोरगरीबांना नेहमीच सहकार्य केले असून सोसायटीचा नावलौकिक वाढविला आहे. त्यामुळे त्यांनी सरपंच व्हावे ही मागणी जनतेतून जोर धरत असल्याने सर्व नेते मंडळींनी सोपानकाका नारनवर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नावाला पसंती दिली असून त्यांची सरपंच पदाची निवड ही पक्की मानली जात आहे. आज त्यांनी शाळेच्या जागेचा धाडसी निर्णय घेतला असून सर्व तरुण व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीशी उभा असून त्यांचा विजय निश्चित असून त्यांना बिनविरोध संधी भेटावी व त्यांच्या हातून गावच्या आपल्या शाळेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी व शाळेतील मुला मुलींची जी नैसर्गिक विधी ची अडचण कायमची दुर करण्यासाठी तानाजी ठोंबरे यांना राजकीय दृष्ट्या नाही पण सामाजिक भावनेच्या हेतूनं सर्वांनी मनमोकळ्या पणाने सहकार्य करावे. व न भुतो न भविष्यती असे त्यांच्या हातून एक सामाजिक, समाज हिताचे कार्य घडवायचे असेल तर सर्व वरिष्ठ मंडळी व तरुण पिढीने सहकार्य करुन या इतिहासात साक्षीदार व्हावं ही नम्र विनंती करण्यात आली आहे. गावच्या विकासांसाठी अशीच धाडशी कामे करण्यासाठी सर्वांनी तानाजी बापू ठोंबरे यांना सहकार्य करावे व आपले आशीर्वाद त्यांच्या पाठीशी उभे करावेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
