शिवसेना माळशिरस तालुका यांच्या मागणीला मोठे यश
माळशिरस (बारामती झटका)
सर्वसामान्यांच्या गरजा व अडचणी लक्षात घेऊन ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या शिवसेनेच्या ब्रीद वाक्यानुसार आय. एम. सी. ने निर्धारित केलेल्या आजारांच्या उपचारांच्या दर पत्रकाप्रमाणे सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी दवाखान्यात जनतेच्या निदर्शनास येतील असे दरपत्रक लावण्यात यावेत, तसेच अन्य समस्यांचेही निवारण करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय ,अकलूज आणि तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, माळशिरस यांना देण्यात आले होते. त्या मागणीला मोठे यश आले आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, आय. एम. सी. ने निर्धारित केलेल्या आजारांच्या उपचारांच्या दरपत्रकाप्रमाणे सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी दवाखान्यात जनतेच्या निदर्शनास येतील असे दर पत्रक लावण्यात यावेत, तसेच खालील नमूद केलेल्या अन्य समस्यांचेही निवारण करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन दिले होते. खाजगी डॉक्टर पेशंटला मनमानी पैसे आकारून लूट करत असल्याबाबत तसेच, एकाच शस्त्रक्रियेसाठी वेगवेगळ्या दवाखान्यात वेगवेगळे चार्जेस आकारले जातात. आयसीयू नावाने पेशंटच्या खिशावरती ताण येतो, बेडचे भाडे, इतर चार्जेस तसेच विविध तपासण्याचे दर मनमानी असतात. तसेच रुग्णालयातील स्टाफची वागणूक चांगली नाही, अशा विविध तक्रारी या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहेत. तरी आपल्या अधिपत्याखालील कार्यरत सर्व खाजगी रुग्णालयामधील अधिकारी यांची बैठक आयोजित करावी तसेच त्यांना भविष्यात अशा प्रकारच्या कोणत्याही तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घेण्याबाबत पत्राद्वारे कळविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.

त्यानुसार आता उद्धव ठाकरे शिवसेना माळशिरस तालुका यांच्या या मागणीला मोठे यश आले असून आता दवाखान्यात दरपत्रक दिसणार आहे. पेशंटच्या नातेवाईकांसाठी दवाखान्यात राहण्यासाठी, अंघोळीसाठी व जेवणाची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दुसऱ्या ठिकाणांचे तपासणी रिपोर्ट आता कोणत्याही दवाखान्यात स्वीकारले जातील. तसेच डिस्चार्ज कार्ड मराठीत मिळणार आहे. महात्मा फुले योजनेच्या लाभार्थ्यांना खर्चाचे विवरणपत्र मिळणार आहे. पेशंट व नातेवाईकांना दवाखान्यातील कर्मचाऱ्यांकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळणार आहे. ॲडमिट पेशंटला रक्त व लघवी तपासण्याचे बिल मिळणार आहे.
तरी पेशंटसाठी काही अडचणी आल्यास ९४२३३२८००९, ९४२३३२७९५५, ९९२२९५३१३१, ९४२२६५२४०८ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन शिवसेना माळशिरस तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng