शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अभ्यास समितीत निवड …
मुंबई (बारामती झटका)
बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांची शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अभ्यास समितीत निवड झाल्याबद्दल सत्कार करताना बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, बळीराजाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा BRS पंढरपूर मंगळवेढा समन्वयक रमेश पवार, जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब वाघमारे, गणेश देशमुख, सुरज वाघमारे व इतर उपस्थित होते…
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी पाठीमागील महिन्यात मुंबई येथे मीटिंग घेऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या होत्या. त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक अभ्यास समिती नेमावी, अशी विनंती केली होती. त्या पद्धतीने आणि मुख्यमंत्री यांनी शासन निर्णय घेऊन राज्यातील प्रमुख तीन लोकांना या समितीमध्ये घेऊन शेतकरी प्रतिनिधी म्हणून राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून या अभ्यास समितीच्या माध्यमातून मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. – मा. पंजाबराव पाटील, संस्थापक अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Поиск в гугле