संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील महाळुंग येथील भुयारी मार्गाची उंची वाढवण्यास नितीन गडकरी यांच्याकडून मान्यता
अकलूज (बारामती झटका)
संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील 118 कि.मी. मधील भुयारी मार्गाची उंची वाढविण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिली.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबई दौऱ्यावर असताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्यांची भेट घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या विविध कामांंबाबत निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील महाळूंग बायपास येथील 118 कि.मी. मधील भुयारी मार्ग हा चार मीटर ऐवजी पाच मीटर करण्यास मान्यता दिली आहे.
महाळुंग येथील पुलाची उंची वाढवण्यास मान्यता मिळाल्याच्या बातमीनंतर महाळुंग परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच केंद्रीय रस्ते व वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे आभार मानले आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

