सदाशिवनगर येथील दोशी क्लाॅथ स्टोअर्समध्ये दीपावली महोत्सव खरेदीवर लकी ड्रॉ कुपनचा धूमधडाका.
कण्हेर गावातील दादा देवकते यांनी 30 हजाराची खरेदी करून 15 कुपन मिळविले, ग्राहकांचा उदंड प्रतिसाद.
सदाशिवनगर ( बारामती झटका )
सदाशिवनगर येथील सुप्रसिद्ध व्यापारी सौ. त्रिशल्ला व श्री. जंबुकुमार प्रेमचंद दोशी, सौ. प्राजक्ता व श्री. प्रशांत दोशी, सौ. प्रियंका व श्री. प्रज्योत दोशी यांनी दोशी क्लाॅथ स्टोअर्समध्ये दीपावली महोत्सव सन 2022 मध्ये खरेदीवर ‘लकी ड्रॉ कुपन’ सुरू केलेले आहे. 1500 रुपयाच्या खरेदीवर एक कुपन, अशी ऑफर दि. 10 ऑक्टोबर ते दि. 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत राहणार आहे. कण्हेर गावातील दादा देवकते यानी 30 हजाराची खरेदी करून 15 कुपन मिळविलेले आहे. ह.भ.प. तुकाराम माने महाराज यांनी सुद्धा मोठी खरेदी केलेली आहे. याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
दोशी क्लाॅथ स्टोअर्स, सदाशिवनगर कारखाना गेट समोर, मेनरोडवर कापड दुकानाचे मोठे शोरूम आहे. सदरच्या दुकानात शर्टिंग, शूटिंग व रेडिमेड कपड्याबरोबर वधू-वरांच्या लग्नासाठी वेगवेगळे ड्रेस, शालू, साड्या, लहान मुलांचे ड्रेस एकाच ठिकाणी मिळत असलेले सुपरिचित कापड दुकान आहे. दीपावली महोत्सवानिमित्त खास ग्राहकांच्या सेवेसाठी लकी ड्रॉ सुरू केलेला आहे.

दिवसभरामध्ये खरेदी केलेल्या ग्राहकांचे कुपन एकत्र जमा करून त्यामधून तीन नंबर काढले जात आहेत व प्रत्येक ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू दिली जात आहे. योग्य किंमत व दर्जेदार कपडे मिळत असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
