सदाशिवनगर येथील रत्नत्रय शैक्षणिक संकुलात भव्य रक्तदान शिबिर
सदाशिवनगर (बारामती झटका)
रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगरचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अनंतलाल दादा दोशी व रत्नत्रय ग्रामीण बिगर पतसंस्था व सन्मती सेवादलाचे अध्यक्ष मा. श्री. वीरकुमार दोशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर शुक्रवार दि. 15 रोजी सकाळी दहा वाजता रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती मा. श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना अर्जुनसिंह मोहिते पाटील म्हणाले कि, मा. श्री. अनंतलाल दादा दोशी यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व आर्थीक क्षेत्रात निरपेक्ष व आदर्शवत कार्य केले आहे. तसेच पुढील आयुष्य आरोग्यदायी व भरभराटी जावे अशा शुभेच्छा दादा व भैय्यांना दिल्या”.


सदर प्रसंगी मा. श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील (माजी उपसभापती पंचायत समिती माळशिरस), सत्कारमूर्ती श्री. अनंतलाल दादा दोशी (संस्थापक अध्यक्ष रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर), श्री. वीरकुमार दोशी (चेअरमन रत्नत्रय पतसंस्था व विजय प्रताप वाचनालय सदाशिवनगर), बाळासो सरगर ( सोलापूर जिल्हा अध्यक्ष भाजप किसान मोर्चा), श्री. प्रमोद दोशी (चेअरमन रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे) श्री. देविदास ढोपे (सरपंच पुरंदावडे ग्रामपंचायत), डॉ. संतोष दोशी, डॉ. अजित गांधी, अरविंद भोसले, शिवराज निंबाळकर, वैभव शहा, लक्ष्मण मगर, संजय गांधी, बबन गोफणे, अभिजित दोशी, सुरेश गांधी, संजय दोशी, बाहुबली दोशी, जगदीश राजमाने, सतीश बनकर, अजय गांधी, प्रताप सालगुडे, संतोष शिंदे, दिपक दिक्षीत, तनोज शहा, ज्ञानेश राऊत, हनुमंत धाईंजे, दीपक राऊत, सनतकुमार दोशी, प्रशात दोशी, रामदास गोफणे, राहुल दोशी, भुजबळ सर, बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम, अनंत दोशी, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सतीश हांगे सर यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
