Uncategorized

सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची सात अपात्र संचालकांच्या रिक्त जागेची निवडणूक लागणार…

श्री शंकर सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष भानुदास सालगुडे पाटील यांच्या पाठपुराव्याची राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी घेतली दखल..

सदाशिवनगर (बारामती झटका)

सदाशिवनगर ता. माळशिरस येथील श्री शंकर सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष श्री. भानुदास सालगुडे पाटील यांनी श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सदाशिवनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर, या कारखान्याच्या संचालक मंडळातील सात रिक्त पदे निवडणुकी द्वारे भरण्यात यावी असा पत्र लिहिले व ई-मेल केलेला होता. त्या अनुषंगाने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे सचिव वसंत पाटील यांनी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर यांना श्री शंकर सहकारी साखर कारखाना या कारखान्याचे सात संचालक पदे निबंधकांनी अपात्र ठरविल्यामुळे सहकार व पणन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दाखल करून आपल्याबाबत सद्यस्थिती अवगत करावी. तसेच विषयांकित कारखाना दि. 15/12/2023 निवडणुकीस पात्र होणार असल्यामुळे सदर कारखान्याच्या संचालक मंडळातील सात रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने आपले सद्यस्थितीदर्शक स्वयं स्पष्ट अभिप्राय प्राधिकरणास दि. 10/02/2023 पर्यंत सादर करण्याच्या सूचना दिलेल्या असल्याने सात अपात्र संचालकांच्या रिक्त जागेची निवडणूक लागणार का ?, अशी सहकार क्षेत्रामध्ये चर्चा सुरू झालेली आहे.

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊन नवीन संचालक मंडळ दि. 10/12/2018 रोजी अस्तित्वात आलेले होते. एकूण 21 संचालक होते त्यापैकी 12 संचालक सद्यस्थितीत कार्यरत आहेत. सात संचालक हे दि. 14/03/2020 च्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 78 (अ)(१)(b) अंतर्गत च्या आदेशाअन्वये अपात्र ठरविण्यात आली आहेत. सदर आदेशाविरोधात संबंधित संचालक यांनी सहकार व पणन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील दाखल केलेले आहे. त्यावर सुनावणी सुरू असून सद्यस्थितीत सदर बाब न्यायप्रविष्ठ असल्याचे प्राधिकरणास कळविलेले आहे. तसेच महिला राखीव प्रतिनिधी मीनाक्षी पोपट सावंत मु.पो. नातेपुते व अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी लक्ष्मण धर्माजी मिसाळ मु. पो. इस्लामपूर हे मयत झालेले आहेत.

श्री शंकर सहकारी साखर कारखाना गेली दोन वर्ष सुरू आहे. सात संचालकाची रिक्त जागेची निवडणूक लागणार का नाही ?, याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांना अहवाल गेल्यानंतर समजणार आहे तोपर्यंत माळशिरस तालुक्यात सत्ताधारी गटाकडून संचालक मंडळासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. तर विरोधी गटाकडून कारखान्यात संचालक मंडळाच्या माध्यमातून चंचू प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button