मळोली गावचे ग्रामदैवत व कुलदैवत पालीचा श्री खंडेराया यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

मळोली (बारामती झटका)
मळोली ता. माळशिरस, येथे ग्रामदैवत व कुलदैवत पालीचा खंडेराया याचे प्रतिरूप श्री खंडोबा यांची नवीन मंदिरात प्राणप्रतिष्ठापना रविवार दि. २१/४/२०२४ रोजी सकाळी ७ ते १२ या वेळेत करण्यात येणार आहे.
शनिवार दि. २०/४/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता श्री खंडोबा मूर्तीची गावातून टाळ मृदंग, हलगी, लेझीम यासह ग्राम प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. तसेच रविवार दि. २१/४/२०२४ रोजी सकाळी ७ वाजता नवीन मंदिराची वास्तुशांती त्यानंतर सकाळी ७ ते १२ श्री खंडोबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व मंदिरासमोर कासव नंदीची प्रतिष्ठापना देखील करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२.१० वा. श्री खंडोबा मंदिराचा कलशारोहन समारंभ होणार आहे. दुपारी १२.१० ते १.१० या वेळेत संत श्री तुकाराम महाराज यांचे वंशज ह. भ. प. बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुपारी १.१० वाजता समस्त ग्रामस्थ व पाहुणे यांच्यासाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता वाघ्या मुरळीचा कार्यक्रम मंदिराच्या परिसरात असणार आहे.

तरी या भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास व सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समिती श्री खंडोबा देवस्थान, मळोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा