सद्गुरू श्री श्री साखर कारखान्याच्या शिरपेचात राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरीच्या रुपाने मानाचा तुरा
पिलीव (बारामती झटका) रघुनाथ देवकर यांजकडून
महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्यावतीने दरवर्षी घेण्यात येत असलेल्या महाराष्ट्र कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धा या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये मुंबई या ठिकाणी घेतल्या गेलेल्या “कामगार केसरी” व “कुमार केसरी” प्रथम क्रमांकाचा मान सद्गुरु श्री श्री साखर कारखाना कुस्ती केंद्र श्री श्रीनगर (राजेवाडी) च्या कालीचरण सोलंकर, आरु खांडेकर या कामगार मल्लांनी अतिशय जिद्द व चपळाईने मिळवुन सांगली, सातारा, सोलापूर जिल्हयाबरोबरच महाराष्ट्राची मान उंचावून सद्गुरु कारखान्याच्या शिरपेचात महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा.ना.सुरेशभाऊ खाडे यांचे हस्ते गदा, स्मृती चिन्ह, प्रशस्तीपत्राने मानाचा तुरा रोवला आहे.
या यशस्वी कामगार मल्लांच्या पाठीवरती सतत शाब्बासकीची थाप आणि प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढविणारे सद्गुरु श्री श्री कारखान्याचे चेअरमन एन. शेषागिरीराव, व्हा. चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, सी. एफ. ओ. रोहीत नारा व सर्व संचालक यांनी अतिशय आनंदाने विजयी मल्लांचा सन्मान व अभिनंदन केले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे “कामगार केसरी” हा किताब सलग पाचव्या वर्षी सद्गुरुच्या शिरपेचात रोवल्याचा आनंद पुर्ण पश्चिम महाराष्ट्रात होत आहे.

याकामी यशस्वी कामगार मल्लांना सि.इ. ओ. आण्णासाहेब शेंडे, जनरल मॅनेजर रामाराव, तसेच एचआर अँड ऍडमिन मॅनेजर सचिन खटके व कारखान्याचे अधिकारी, पदाधिकारी व वस्ताद महादेव ठवरे, अमोल मदने, मोहन मदने, दिलीप शेंबडे, खांडेकर, बडरे, दगडे या सर्वांचे, मोलाचे सहकार्य लाभले. असे विजयी कामगार मल्लांनी सत्काराच्या वेळी आवर्जून सांगितले.
या यशस्वी मल्लांचे सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रभरामध्ये कौतुक होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng