सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला…
कारखान्याच्या प्रारूप मतदार यादी अंतिम करण्याच्या हालचालीला वेग…
अकलूज (बारामती झटका)
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड अकलूज, ता. माळशिरस या कारखान्याची प्रारूप तात्पुरती यादी दि. १०/३/२०२३ रोजी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) सोलापूर विभाग सोलापूर यांनी जाहीर केलेली असल्याने कारखान्याच्या प्रारूप मतदार यादी अंतिम करण्याच्या हालचालीला वेग आलेला असून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याची मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम कारखान्याचे सूचनाफलक, नोटीस बोर्ड व जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरण तथा प्रादेशिक सहसंचालक सोलापूर विभाग सोलापूर यांचे कार्यालयीन सूचना फलकावर दि. १०/३/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदरच्या संस्थेच्या सभासदांनी दावे व आक्षेप अर्जावर दाखल करण्याचा कालावधी दि. १०/३/२०२३ ते २०/३/२०२३ असा राहील. तात्पुरत्या मतदार यादीवरील दावे व अक्षर अर्जावर निर्णय देण्याचा कालावधी दि. २१/३/२०२३ ते ३१/३/२०२३ राहणार आहे. अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची ५/४/२०२३ ही तारीख आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या प्रारूप यादीत नमूद नावांमधील पत्त्यामधील व इतर कोणत्याही बाबी विषयक किंवा वगळणी बाबत संस्थेचे सभासद उपरोक्त नमूद दिनांक पर्यंत निम्न स्वाक्षरीत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात जावे. हरकती दाखल करू शकतील असे राजेंद्रकुमार दराडे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) सोलापूर विभाग सोलापूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये जाहीर केलेले आहे.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे २३ हजार मतदार सभासद आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, माढा, करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, असे तालुके आहेत. तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका आहे. असे सात तालुक्यातील सभासद आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मदनसिंह माने देशमुख, वेळापूर व प्रभाकर इंगळे सरदेशमुख, मळोली या दोन सभासदांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झालेली नव्हती. साखर कारखान्याची दोनदा निवडणूक लागलेली होती. बाकीच्या वेळी निवडणुका बिनविरोध झालेल्या होत्या. सध्या राजकीय वातावरण वेगळे असल्याने निवडणूक बिनविरोध होणार का ? रंगतदार होणार ? याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Wow, superb blog format! How long have you ever been blogging for?
you made running a blog look easy. The full glance of
your web site is wonderful, as well as the content!
You can see similar here dobry sklep