सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला…
नागेश पाटील निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विशेष भूसंपादन अधिकारी क्रमांक 7 सोलापूर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
मळोली (बारामती झटका)
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड शंकरनगर अकलूज, ता. माळशिरस या साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू झालेली असून उमेदवारी अर्ज दि. 17 एप्रिल 2023 पासून सुरू झालेले आहे. नागेश पाटील निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विशेष भूसंपादन अधिकारी क्रमांक 07 सोलापूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केलेले आहे.
नामनिर्देशन पत्र दि. 17 एप्रिल ते दि. 21 एप्रिल 2023 पर्यंत सकाळी 11 ते 03 या वेळामध्ये दाखल केले जातील. दि. 24 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता छाननी होईल. दि. 25 एप्रिल ते 09 मे 2023 पर्यंत दुपारी 03 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेतले जातील. दि. 10 मे रोजी उमेदवारांना चिन्हे वाटप केली जातील. दि. 21 मे 2023 रोजी सकाळी 08 ते सायंकाळी 05 या वेळेमध्ये आवश्यकता असल्यास मतदान घेण्यात येईल. मतमोजणी दि. 22 मे 2023 रोजी सकाळी आठ वाजता सुरू होऊन संपेपर्यंत सुरू राहणार आहे. मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांची निवडणूक जाहीर झालेली आहे. व्यक्ती उत्पादक मतदार संघात सहा गट आहेत. त्यामध्ये 15 उमेदवार उभा राहतील. अकलूज 02, बोरगाव 02, वेळापूर 02, माळशिरस 03, बावडा 03, शेटफळ हवेली 03 असे 15 उमेदवार असणार आहेत. उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी 01, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रतिनिधी 01, महिला राखीव प्रतिनिधी 02, इतर मागासवर्ग प्रतिनिधी 01, भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गाचा प्रतिनिधी 01 असे एकूण 21 उमेदवार निवडून जाणार आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng