ताज्या बातम्याराजकारण

सांगोला येथे रविवारी शरदचंद्रजी पवार आणि देवेंद्रजी फडणवीस एकाच व्यासपीठावर

स्व. गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण व महाविद्यालयाचा नामांतर सोहळा

सांगोला (बारामती झटका)

सांगोला येथे स्वर्गीय डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण व महाविद्यालय नामांतर सोहळ्यासाठी रविवार दि. १३ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्रजी पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या कार्यक्रमासाठी एकाच व्यासपीठावर येणार आहेत. याच कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील आजी-माजी आमदार व प्रमुख नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. अनिकेत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथे रविवारी स्वर्गीय डॉक्टर गणपतराव देशमुख यांचे महाविद्यालयाच्या आवारात उभारलेल्या स्मारकाचे अनावरण व महाविद्यालय नामांतर सोहळ्यासाठीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आयोजन करण्यात आले आहे.

पुणे येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमानंतर शरदचंद्रजी पवार व देवेंद्रजी फडणवीस सांगोल्यात एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रामराजे निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजी पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, राम शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, आमदार बबनराव शिंदे, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, आमदार अनिल बाबर, आमदार संजय मामा शिंदे, आमदार समाधान आवताडे, आमदार यशवंत माने, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार राजेंद्र राऊत, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार प्रशांत परिचारक, नरसय्या आडम, राजेंद्र देशमुख, दिलीप माने वैभव नायकवडी, शिवाजी काळुंगे, बाबुराव गुरव, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, यांच्यासह जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्षांचे नेते, प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अनिकेत देशमुख यांनी गुरुवार दि. १० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या स्मारकाचे वजन ६०० किलो असून ते संपूर्ण ब्रांझ धातूपासून बनवले आहे. स्मारकाची उंची साडेआठ फूट असून त्याची उभारणी गजानन सलगर मिरज यांनी केली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button