२५४ माळशिरस (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण संपन्न.

अकलूज (बारामती झटका)
२५४ माळशिरस (अ.जा) विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूककामी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे निवडणूक बाबत प्रशिक्षण दि. २६ व २७ आक्टोबर रोजी एकूण चार सत्रात पार पडले असून दोन्ही दिवशी सकाळी १० ते दुपारी १ वापेजर्यंत व दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या दोन सत्रात प्रत्येकी ४५० अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण स्मृती भवन, अकलूज येथे देण्यात आले.

मा.निवडणूक निर्णय अधिकारी, २५४ माळशिरस (अ.जा.) मतदारसंघ, श्रीमती विजया पांगारकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश शेजुळ व निवासी नायब तहसिलदार अमोल कदम यांचेकडून देण्यात आले. त्याच दिवशी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत व दुपारी २.०० ते सांयकाळी ५.०० वाजेपर्यंत मतदानयंत्र हाताळणी बाबतचे प्रशिक्षण क्षेत्रिय अधिकारी व मास्टर ट्रेनर यांचेकडून महर्षी प्रशाला, यशवंतनगर येथे देण्यात आले.


देण्यात आलेल्या प्रशिक्षणावरती उजळणीसाठी ५० गुणांची बहुपर्यायी परिक्षा घेण्यात आली. सदर प्रशिक्षणा वेळी चहा, नाष्टा, जेवणाची तसेच आरोग्य तपासणी बाबतची व्यवस्था करण्यात आलेली होती. दोन्ही दिवशी एकूण १८०४ अधिकारी व कर्मचारी पैकी १६९५ अधिकारी व कर्मचारी यांनी प्रशिक्षण घेतले असून १०९ अधिकारी व कर्मचारी गैरहजर होते. गैरहजर अधिकारी व कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून त्यांचा खुलासा मागविण्यात आला आहे. संबंधितांकडून खुलासा समाधानकारक प्राप्त न झाल्यास त्यांचेवरती लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० चे कलम १३४ अन्वये नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.