Uncategorized

सामाजिक व आर्थिक परिवर्तनाकरिता ओबीसींनी सत्ताधीश व्हावे – माजी मंत्री महादेव जानकर

नागपूर (बारामती झटका)

सामाजिक क्रांतीशिवाय राजकीय परिवर्तन अशक्य आहे. याकरिता आपल्या स्वतःमध्ये अमुलाग्र परिवर्तन आपल्याला घडवून आणावे लागेल आणि फुले, शाहू, आंबेडकरांची विचारधारा पोहोचवून स्वतःच्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनाकरिता ओबीसी समाजाने सत्ताधीश व्हावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले. सामाजिक परिवर्तनाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज व मंडल मसिहा विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने एक दिवसीय संवाद परिषदेचे आयोजन सेवा दल महिला महाविद्यालय, सकरदरा चौक, नागपूर या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना जानकर म्हणाले की, ओबीसींच्या, बहुजनाच्या सर्वांगीण विकासाकरिता आजच्या चळवळीची भूमिका आणि मराठ्यांचे ओबीसीकरण हा शासनाचा डाव आहे. हे ओबीसी समाजासमोरील मोठे आव्हान असून या आव्हानाला सामोरे जात असताना ओबीसी समाजाने भविष्यात मोठ्या प्रमाणावर एकजूट करावी लागणार असून ओबीसींनी आता सत्तेचे स्वप्न पाहिले पाहिजे आणि सत्तेच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले पाहिजे. तोपर्यंत आपले हक्क आणि अधिकार आपल्याला मिळणार नाहीत. त्याकरिता मी जिवाचं रान करण्यासाठी घरदार सोडून रात्रंदिवस प्रयत्नशील आहे. यासाठी ‘जितनी जितकी संख्या भारी, उतनी उसकी भागीदारी’, या तत्त्वावर मी आज अखेर प्रस्तापितांबरोबर संघर्ष करीत आलो आहे. यासाठी तुम्ही सुद्धा जीवाचं रान करण्याकरिता सज्ज व्हा. असेही शेवटी जानकर म्हणाले.

यावेळी बोलताना प्राध्यापक सुशीला मोराळे म्हणाल्या की, देशामध्ये सामाजिक परिवर्तन व आर्थिक मुक्तीकरिता लढा देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या संघर्षाला आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण आता काम केले पाहिजे. असेही मोराळे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश पिसे, भूमिका विलास काळे यांनी मांडले. तर आभार सुधीर सुर्वे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता उमेश कोराम, अनिल कुमार, इंजिनिअर हमीद, शुभांगी घाटोळे, मिस्टर अफजल, हरी किशनदादा हटवार, प्राध्यापक राहुल मून, अरुण काळे, संजय रामटेके यांनी मेहनत घेतली. तर मुख्य आयोजन राष्ट्रीय संयुक्त मोर्चा भारत, भारतीय पिछडा (ओबीसी) संघटक, ओबीसी जनमोर्चा संविधान परिवर्तन, विदर्भ तेली समाज महासंघ, समाज क्रांतीपरिवार, महाराष्ट्र कास्टट्राईब संघटना यांनी आयोजन केले. या कार्यक्रमावेळी सर्वांचे स्वागत स्वागताध्यक्ष संजय शेंडे अध्यक्ष सेवा दल महिला महाविद्यालय, नागपूर यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button