आरोग्यताज्या बातम्याराजकारणसामाजिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

दहिवडी (बारामती झटका)
“आपले रक्तदान, अनेकांसाठी जीवनदान” हाच उद्देश ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी माण-खटाव यांच्या सौजन्याने गुरुवार दि. १२ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वा. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन प्रभाकर देशमुख संपर्क कार्यालय, दहिवडी येथे करण्यात आले आहे.
तरी सर्व माण-खटाव वासियांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने रक्तदान करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, पुणे-कोकणचे माजी विभागीय आयुक्त तसेच रायगड विकास प्राधिकरणचे सदस्य प्रभाकर देशमुख यांनी केले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.