सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन..
माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांना मातृशोक…
माळशिरस (बारामती झटका)
सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने सोमवार दि. २६ जून २०२३ रोजी सायंकाळी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्या मातोश्री होत्या.
जिजाबाई व विठ्ठल सातपुते यांनी प्रतिकूल परिस्थितीत संसार करून आपल्या मुलांना चांगले संस्कार व उच्च शिक्षण दिलेले आहे. माळशिरस तालुक्यामध्ये अनेक वर्ष ऊसतोड कामगार म्हणून काम केलेले आहे. त्यांचा मुलगा राम सातपुते यांना माळशिरस तालुक्याचे आमदार होण्याचे भाग्य लाभलेले आहे. दोन-तीन महिन्यापासून दवाखान्यांमध्ये औषध उपचार सुरू होते. माळशिरस तालुक्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखींचे आगमन होऊन पालखी तालुक्याच्या सरहद्दीवरून पंढरपूरकडे जात असताना सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतलेला आहे.

जिजाबाई यांना सौभाग्य मरण आलेले आहे. त्यांच्यावर डोईठाण, ता. आष्टी, जि. बीड येथे मंगळवार दि. २७ जून २०२३ रोजी सकाळी ०९ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. स्व. सौ जिजाबाई सातपुते यांच्या मृतात्म्यास सद्गती प्राप्त होवो व सातपुते परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng