स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्वर्गीय सौ. जिजाबाई सातपुते यांचा रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम उद्याच संपन्न होणार..
आष्टी (बारामती झटका)
डोईठाण, ता. आष्टी, जि. बीड, येथील सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे वयाच्या 74 व्या वर्षी अल्पशा आजाराने सोमवार दि. 26 जून 2023 रोजी सायंकाळी 07.20 वाजता दुःखद निधन झाले. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांना उपचारासाठी पुणे, सोलापूर येथून मांडवे तालुका माळशिरस येथील श्रीराम निवास या ठिकाणी आणल्यानंतर त्यांनी जगाचा निरोप घेतलेला होता.



स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांच्यावर मूळ गावी डोईठाण, ता. आष्टी येथील शेतामध्ये शोकाकुल वातावरणात मंगळवार दि. 27 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजता अंतिम संस्कार करण्यात आलेले आहे.
स्वर्गीय जिजाबाई यांना सौभाग्य मरण आलेले असून त्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असल्याने हरिनामाच्या जयघोषामध्ये अंत्ययात्रा फुलांनी सजविलेल्या स्वर्ग रथातून निघालेली होती. अंत्ययात्रेच्या वाटेने पुष्प व हळदी कुंकवाचा सडा टाकण्यात आलेला होता. वारकऱ्यांनी हरिनामाच्या जयघोषामध्ये अंत्ययात्रेला सुरुवात केलेली होती.


स्वर्गरथामध्ये पार्थिव देह ठेवून शेतामध्ये दहन देण्याचा कार्यक्रम झालेला आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय, विधान परिषदेचे आमदार सुरेश धस, आष्टीचे आमदार बाळासाहेब आसबे यांच्यासह आष्टी तालुका व बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याचे प्रतिनिधित्व चांगल्या प्रकारे केलेले असल्याने सर्वसामान्य जनतेतून मातृप्रेमाला मुकलेले असल्याने हळहळ व्यक्त केली जात होती. खासकरून माळशिरस तालुक्यातून जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, नातेपुते नगरपंचायतचे पदाधिकारी व नगरसेवक, माळशिरस नगरपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी व नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश, जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, आरपीआय आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


माळशिरस तालुक्यातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, दूध संस्था, मजूर संस्था, सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ यांच्यासह सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार श्रीकांतजी भारतीय, आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आसबे यांच्यासह आष्टी तालुका व बीड जिल्ह्यातील तसेच माळशिरस तालुक्यातील अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मनोगते व्यक्त केली.






स्वर्गीय सौ. जिजाबाई यांचा मृत्यू सोमवार दि. 26 जून 2023 रोजी झालेला असल्याने त्यांचा रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम बुधवार दि. 28 जून 2023 रोजी सकाळी 08 वाजता होणार आहे. दहाव्याचा कार्यक्रम गुरुवार दिनांक 29 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng