“स्वाभिमानी चषक” भव्य पेप्सी बाॅल क्रिकेट स्पर्धेचे माळशिरस तालुक्यात आयोजन.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निष्ठावान शिलेदार चिरंजीव समाधान काळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवशीय धमाका.
विझोरी ( बारामती झटका )
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी व स्वाभिमानीची मुलुख मैदानी तोफ माजी मंत्री रविकांतजी तुपकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी चषक 2022 – 2023 भव्य पेप्सी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शनिवार दि. 31/12/2022 ते रविवार दि. 01/01/2023 रोजी सकाळी 09 ते 06 या वेळात निमगाव पाटी विझोरी (आनंदीमेळाव्या शेजारी), ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. सदर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन श्री. अजितभैया बोरकर मित्रपरिवार यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/12/Screenshot_2022-09-03-20-44-06-99_40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12-6-747x1024-1.jpg)
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/12/Screenshot_2022-09-03-20-44-06-99_40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12-6-747x1024-1.jpg)
भव्य पेप्सी बॉल क्रिकेट स्पर्धेतील प्रथम बक्षीस लोणंद फलटण पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सोमनाथअण्णा वाघमोडे यांच्यावतीने 11,111 रु., द्वितीय बक्षीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस विधानसभा प्रमुख व पिसेवाडी ग्रामपंचायतीचे नूतन सदस्य साहिल आतार यांच्या वतीने 7,777 रु., तृतीय बक्षीस स्वरा दूध संकलन केंद्र विझोरी चेअरमन श्री प्रशांत शहाजी काळे यांच्या वतीने 5,555 रु., चतुर्थ बक्षिस ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड. सिताराम झंजे यांच्या वतीने 2,222 रु., अशी बक्षिसे आहेत. सदरच्या स्पर्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी काका बागल, माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने देशमुख, ज्येष्ठनेते मगन काळे, सुप्रसिद्ध डॉ. सचिन शेंडगे, माळशिरस तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक निनाद पाटील, बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत.
सदर स्पर्धेचे संयोजक विठ्ठलआप्पा जाधव, अच्युतराव काळे, सागर काळे, धवल काळे, सचिन बोरकर, सागर झंजे, तेजस भाकरे, साधू राऊत, पै. विक्रांत काळे, अजित काळे, अक्षय काळे, राजवर्धन काळे, तन्मय काळे, रामचंद्र पवार, यल्लाप्पा चौगुले, शंकर जाधव, विलास जाधव, रामराज वाघमोडे, प्रकाश घोगरे, किशोर गोरवे, रणजीत वगरे, मनोज गाडे, अजिनाथ पंडित, सागर काळे, स्वप्नील बोरकर आदी करणार आहेत. तरी सर्व क्रिकेट प्रेमींनी प्रेमकुमार चौगुले 8999987553, आहिल पठाण 9561177136, विजय वाघंबरे 9960107009, नामदेव मदने 8390407609, सचिन बोरकर 7350576688, या नंबरशी संपर्क साधावा. प्रत्येक संघास बॉल फ्री दिला जाईल नियम व अटी सर्वांना लागू राहतील. दोन दिवशीय धमाक्यामध्ये सर्वांनी सहभागी राहावे, असे आवाहन श्री. अजितभैया बोरकर मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात येत आहे.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/12/WhatsApp-Image-2022-12-27-at-10.10.47-AM-595x1024.jpeg)
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/12/WhatsApp-Image-2022-12-27-at-10.10.47-AM-595x1024.jpeg)
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
gcpcxzhzbsuujehkdjsawbcxsdygkq https://mines.gouv.ne/local/cache-js/vybor-nadezhnogo-onlain-kazino.html