गोपाळराव देव प्रशाला व ज. चं. आगाशे कनिष्ठ महाविद्यालयात पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न !

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथील गोपाळराव देव प्रशाला व ज. चं. आगाशे कनिष्ठ महाविद्यालयात पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. गणेश संदिपान कचरे (अवर सचिव मंत्रालय मुंबई) हे होते. तर यावेळी ॲड. माधव मिरासदार (अध्यक्ष हनुमान शिक्षण प्रसारक संस्था), ॲड. मिलिंद कुलकर्णी, श्री. रामचंद्र दोशी, श्री. संतोष कुलकर्णी, श्री. धनंजय मस्के, श्री. राजाराम ढाले, श्री. रामचंद्र सिद, श्री. सुभाष शिंदे, मुख्याध्यापक श्री. धनंजय केसकर, उप मुख्याध्यापक श्री. सूर्यकांत जानकर, पर्यवेक्षक सौ. शारदा महामुनी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, मुलांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच बौद्धिक आणि मानसिक प्रगती ही आवश्यक असल्याचे सांगितले. स्पर्धा परीक्षांची लहानपणापासून आवड निर्माण होते. शहरी भागातील मुलांपेक्षा ग्रामीण भागातील मुले परिस्थितीशी संघर्ष करत यश संपादन करतात, असे सांगितले

तर ॲड. मिलिंद दादा कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या स्थापनेपासूनचा यशस्वी आढावा घेतला. तर मुख्याध्यापकांनी त्यांच्या भाषणात शाळेच्या उज्वल निकालाची परंपरा सांगितली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चंदनशिवे सर यांनी केले. तर पारितोषिकांचे वाचन श्री. राजमाने सर यांनी केले. तर उपस्थित सर्वांचे आभार श्री. काटकर सर यांनी मानले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.