Uncategorizedताज्या बातम्या

२१ व्या शतकात केरळ येथून प्रथमच पायी हजयात्रेस जाणारे हजयात्री शहाब उर्फ शहाबुद्दीन.

केरळ ( बारामती झटका) हुसेन मुलाणी यांजकडून

सौदी अरब या देशातील पवित्र तीर्थक्षेञ व इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर (ईश्वराचे प्रेरणास्थान मानले जाते) यांचा अस्थाना, मजार (समाधी) याचे दर्शन घेण्याचे आणि ते स्थळ पाहण्याचे प्रत्येक मुस्लिम बांधवांचे स्वप्न आणि इच्छा असते. परंतु हजारो किलोमीटर पायी चालून हजयात्रेसाठी जाणे प्रत्येकाला शक्य होत नाही. परंतु, केरळ राज्यातील मल्लपुरम जिल्ह्यातील कोट्टक्ल जवळ आठवनाड येथील राहणारा शहाब उर्फ शहाबुद्दीन हा अनेक समस्या झेलत मनाशी ठाम निश्चय करून केरळ ते सौदी अरब येथील हज यात्रेस निघाला असून तो अशा परिस्थितीत निघाला आहे की, जगात सर्वत्र दहशतवादी आतंकवादी विदारक यासारख्या घटना घडत असताना पायी हज यात्रेस निघाला असून हे चिंताजनक आहे‌.

तो केरळ, कर्नाटक, हुबळी, महाराष्ट्रातून रायगड, पनवेल, कल्याण, गुजरातमधून सुरत, राजस्थान, दिल्ली पुढे पाकिस्तान, इराक इराण, कुवेत मार्गे अरबस्थानातील मक्का मदिना येथे किमान ८६०० किलोमीटर अंतर पायी चालून आठ ते नऊ महिन्यानंतर म्हणजे फेब्रुवारी किंवा मार्च 2023 मध्ये तो सौदी अरेबिया येथील तीर्थक्षेत्र मक्का मदीना येथे पोहोचणार आहे.

मागील एक वर्षापासून हा पायी हजयात्रेस जाण्याची तयारी करत होता. त्यांच्या या केरळपासुन सुरु झालेल्या हजयाञेच्या प्रवासाप्रसंगी जागोजागी व प्रत्येक गावात व शहरात त्याचे भक्ती भावाने त्याचे स्वागत होत असुन त्यांचे म्हणणे आहे की, माझा प्रवास हा मनापासून आणि ईश्वर प्रेम अंतकरणापासून असून याबाबत मला पायी हज यात्रेच्या बाबतीत कोणाचेही मार्गदर्शन लाभले नाही. कारण पूर्वीच्या काळात हजयात्रा केलेले हज याञी आज या जगात हयात नाहीत. मी आमच्या आजोबा, पणजोबांच्या तोंडून ऐकले होते की पूर्वीचे लोक पायी हज याञेस जात होते. कोणत्याही कारणास्तव आपल्या देशातून विदेशात जाण्यासाठी विदेश मंत्रालयाकडून (विझा) परवानगी घ्यावी लागते. या संदर्भात विदेश मंत्रालयाकडे शिहाब यांनी परवान्याची मागणी केली.

माञ विदेश मंञालयातील अधिकारी सुद्धा शहाब उर्फ शहाबुद्दीन यांना परवाना देताना विवंचनेत होते की, पायी हज याञेला जाण्यास परवानगी कशी द्यायची. विदेश मंत्रालयाकडे अशी पायी हजयाञेस जाण्याची परवानगी आजतागायत कोणी मागितली नव्हती. त्यामुळे परवानगी द्यायची कशी हा प्रश्न त्यांच्या समोर होता. शेवटी त्यांना परवानगी द्यावी लागली. शिहाब यांनी पायी हजयाञेस दररोज २५ किलोमीटर अंतर चालण्याचा निश्चय केला असुन त्यांच्याकडे मोजकेच सामान आहे. जेणेकरुन प्रवासात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

भारत देशात असेपर्यंतचा प्रवास सुखकर होणार आहे. परंतु, भारत सोडल्यानंतरचा प्रवास हा खडतर, जोखिमदार, भितीदायक आणि ञासदायक आहे. कारण जगात विविध घटना घडत आहेत. त्यांचा प्रवास यशस्वी होवो आणि हजयाञा सुखकर होवो ही अल्लाह चरणी ही बारामती झटकाचे संपादक शिवश्री श्रीनिवास कदम पाटील यांच्याकडून प्रार्थना आणि शुभकामना.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort