Uncategorized

५ फेब्रुवारी पासून टेंभूर्णी फेस्टिव्हलचे आयोजन

टेंभूर्णी (बारामती झटका)

टेंभूर्णी येथील बहुजन प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दि. ५ फेब्रुवारी २०२३ ते दि. १२ फेब्रुवारी २०२३ या काळात “टेंभूर्णी फेस्टिव्हल २०२३” या भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फेस्टिव्हलचे संयोजक व अध्यक्ष संतोष वाघमारे यांनी दिली.

फेस्टिव्हलचे यंदाचे यशस्वी सलग १९ वे वर्ष असून हा महोत्सव टेंभुर्णी शहरासह संपूर्ण माढा तालुक्यातील नागरिकांचे मुख्य आकर्षण बनला आहे. कला, ज्ञान, विद्यान, मनोरंजन, कृषी व औद्योगिक प्रदर्शन, सामाजिक प्रबोधनपर, अंधश्रद्धानिर्मुलन यावर आधारित प्रदर्शन, कार्यक्रमामध्ये दि. ५ रोजी गायन स्पर्धा लहान गट, दि. ६ डान्स, दि‌. ७ गायन स्पर्धा मोठ गट, दि. ८ भजन स्पर्धा, दि. ९ तबला वादन स्पर्धा, दि. ११ फॅन्सी ड्रेस स्पर्धा लहान गट या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत.

तसेच सांस्कृतिक कार्यक्रम ऑर्केस्ट्रा, लावण्या, भारुड, लेझीम, वाघ्या मुरुळी या कार्यक्रमाबरोबरच एकेरी डान्स स्पर्धा, ग्रुप डान्स स्पर्धा यांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तर नागरिकांच्या व बाळगोपाळांच्या मनोरंजनासाठी आकाश पाळणा, दोन मारुती कारचा मौत का कुवा, बैंक इस पन्नालाल, सत्यम्बी चांदतारा, टोराटोरा, मिनी ट्रेन पैरकला, जादूचे प्रयोग इत्यादी साधने उभारण्यात येणार आहेत. हॉटेल्स व महिलांच्या खरेदीसाठी ज्वेलरी, संसार उपयोगी वस्तू, लहान मुलांची खेळणी यांची १०० भव्य दुकाने उभारली जाणार आहेत. तसेच गृह उपयोगी वस्तू व कृषी उपयोगी अवजाराचे प्रदर्शनही यामध्ये आहे. कुर्डुवाडी रोडवरील भव्य मैदानात हा महोस्तव पार पडणार असून उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे.

बहुजन प्रतिष्ठान मार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आजवर मूणत माजी न्या. बी. जी. कोळसे-पाटील, डॉ. बाबा आढाव, ॲड. भास्करराव आव्हाड, साहित्यिक डॉ. आनंद यादव यासारखे विचारवंत भेट देऊन गेलेले आहेत. गेल्या तीन वर्षापासून सिने क्षेत्रातील कलावंत उद्घाटनासाठी हजेरी लावत आहेत. प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी संस्थापक रघुनाथ वाघमारे, अध्यक्ष संतोष वाघमारे, विकास सुर्वे, गणेश पोळ, सोमनाथ नलवडे, हरिशचंद्र गाडेकर, धनंजय भोसले, झुंबर जाधव, सर्जेराव मुरकुले, योगेश दाखले, चंद्रकांत कुटे, पोपट सरडे, शरपुद्दीन मुलाणी, समाधान बोराटे, अमोल कुटे, अशपाक तांबोळी, विनोद आखाडे, दशरथ कसबे, रोहिदास वाघमारे, सुनील जगताप, बाळू मोरे इ. कार्यकते परिश्रम आहेत. अधिक माहितीसाठी संतोष वाघमारे (९८२०१०८२१०) यांचेशी संपर्क साधन्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button