अंकोलीच्या भैरवनाथ विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत भरघोस यश
अंकोली (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत अंकोलीच्या भैरवनाथ विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळवून जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकविले आहे.
आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत अंकोली येथील भैरवनाथ विद्यालयातील 29 विद्यार्थी या परीक्षेस बसविले होते. त्यापैकी 16 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर चार विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले. यामध्ये सुरज प्रभाकर गरड याने 302 पैकी 212, सृष्टी दशरथ रणदिवे हिने 202, उमे आयमन जमीर मुलाणी हिने 200 तर पृथ्वीराज अशोक सुरवसे याने 188 गुण मिळवले आहेत. त्यांना हे यश मिळविण्यासाठी विभागप्रमुख हनुमंत राऊत (गणित व बुद्धिमत्ता), सागर पाटील (मराठी), अण्णासाहेब लेंडवे (इंग्रजी) यांचे मार्गदर्शन लाभले.
या त्यांच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, माजी चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख, विभागीय चेअरमन संजीव पाटील, सहसचिव बी. एन. पवार, विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंखे, स्थानिक स्कुल कमिटीचे सदस्य बाबासाहेब क्षीरसागर, सज्जन पवार, संग्रामसिह पवार, निवृत्त पोलीस अधिकारी दत्तात्रय कामतकर, सरपंच पांडुरंग येळवे, शेजबाभुळगावचे नागराज पाटील, प्राचार्य संजय जोशी व पर्यवेक्षक डी. के. देशमुख यांनी अभिनंदन केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng