Uncategorized

अकलूज आगाराच्या एस. टी. बस भाजपा माळशिरस तालुका उपाध्यक्ष बलभीम जाधव व विद्यार्थ्यांनी एक तास रोखून धरल्या.

अकलूज (बारामती झटका)

सांगोला रोडवरील मळोली साळमुख व फळवणी या ठिकाणावरून कॉलेज साठी अकलूज ला येजा करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात गैरसोय वारंवार होताना दिसत आहे
दोन ते अडीच तास विद्यार्थ्यांना रोजच बसची वाट पाहत बस स्टॅन्ड वरती ताटकळत बसावे लागते रात्री उशिरा गावात पोचल्यानंतर तिथून रात्री चार- ते पाच किलोमीटर अंतरावरती मुलींना अंधारात घरी जाताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे याबद्दल वारंवार डेपो मॅनेजर व वाहतूक नियंत्रक यांच्याशी संपर्क साधला,सुमारे चार ते पाच वेळा लेखी निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची उपाययोजना अकलूज आगाराकडून होताना दिसत नाही.


अकलूज आगाराचा लँडलाईन फोन नंबर सुमारे एक महिना पासून बंद आहे डेपो मॅनेजर श्री शिंदे साहेब यांना विद्यार्थ्यांनी व श्री बलभीम जाधव यांनी स्वतः फोन केला असता त्यांनी फोन उचलण्याचे सौजन्य दाखवले नाही, नियंत्रक कक्षाचा दूरध्वनी क्रमांक बंद असल्याकारणाने बस ची चौकशी करणे, बस स्टॅन्ड शी संपर्क साधने प्रवासी व पालकांना यामुळे अडचणीचे बनले आहे वाहतूक नियंत्रण कक्षाचा फोन नंबर एक महिना बंद राहने व विनंती करूनही तो चालू न करणे यासारखे बेजबाबदारपणा व दुर्दैव दुसरे काय कोणत्याही लेखी तक्रारी, निवेदनाची दखल न घेता.


याउलट गाडी का रोखुन धरली म्हणून अकलूज आगाराने व अकलूज पोलीस स्टेशनचे चार अधिकारी यांनी विद्यार्थ्यांवर व भाजपा अध्यक्ष बलभीम जाधव यांच्यावर कारवाई करण्याबाबत उलट भूमिका घेतली
विद्यार्थ्यांच्या लेखी कोणतीही संवेदन नसलेले अकलूज आगार, वारंवार भोंगळ कारभार करत आहे, विनंतीची, लेखी निवेदनाची तक्रार न घेतल्यामुळे
संतप्त झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी व भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका उपाध्यक्ष बलभीम जाधव यांनी आज अकलूज आगारातून कोणतीही बस बाहेर जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेऊन सुमारे एक तास बाहेर जाणाऱ्या बस आज दिनांक 15 शनिवार रोजी सायंकाळी 5:30 ला रोखून धरल्या, शेवटी अकलूज पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर व यापुढे साडेपाच वाजता अकलूज सांगोला बस सोडण्यात येईल हा शब्द अकलूज आगाराच्या अधिकाऱ्यांकडून घेतल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आलं यापुढेही अकलूज -सांगोला बस निश्चित वेळेवर सोडण्यात आली नाही तर मात्र याहूनी आक्रमक पवित्रा समस्त विद्यार्थ्यांसाठी घेऊ असं भाजपा उपाध्यक्ष बलभीम जाधव यांनी यावेळी सांगितले
.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

  1. This is the right site for anybody who hopes to find out about this topic.
    You realize so much its almost tough to argue with you
    (not that I actually will need to…HaHa). You definitely put
    a new spin on a subject which has been discussed for decades.
    Great stuff, just great!!

  2. Hey there! Do you know if they make any plugins to assist with SEO?

    I’m trying to get my blog to rank for some targeted keywords but I’m not seeing very good success.
    If you know of any please share. Thanks!
    You can read similar art here: Blankets

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button