Uncategorized

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या विरोधात तालुक्यातील राजकारण वेगळ्या वळणावर…

सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या विरोधात लागली फिल्डिंग, विरोधी गटाच्या गळक्या मोटेला कमळाच्या पाकळ्यांचे वेल्डिंग.

….आमचं पण ठरलंय !!! अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप बुद्रुकला सामावून घेण्याचे ठरलं…

अकलूज (बारामती झटका)

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील गटाने उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. तालुक्यातील मोहिते पाटील विरोधी गटातील आपापसांतील मतभेद व गटातटाच्या राजकारणामुळे विरोधकांची एकत्र मोट बांधूनसुद्धा ऐनवेळी गळती होतं होती. याची बारामती झटका वेब पोर्टलवर बातमी प्रसारित झालेली होती. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या विरोधात तालुक्यातील राजकारण वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेली आहे.

महाभारताची पुनरावृत्ती होऊन स्वकीय यांच्यामध्ये निवडणूक लागण्याची शक्यता आहे. सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या विरोधात विरोधकांची फिल्डिंग लागली आहे. मोहिते पाटील गट भाजपमध्ये असतानासुद्धा विरोधी गटाच्या गळक्या मोटेला कमळाच्या पाकळ्याचे वेल्डिंग होणार असल्याने निवडणुकीची रंगत वाढलेली आहे. आमचं पण ठरलंय… अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप बुद्रुक गटाला सामावून घेण्याचे विरोधी गटाने ठरवलं आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज सोमवार दि.
03/04/2023 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करावयाची आहेत. सत्ताधारी मोहिते पाटील गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. बिनविरोध निवडणूक होईल. विरोधी गटाचा वेळ होणार नाही, असा गोड गैरसमज सत्ताधारी गटाचा झालेला होता. मात्र, विरोधकांनी जोरदार मोर्चे बांधणी केलेली असून उमेदवारांची यादी पाहिल्यानंतर माळशिरस तालुक्यातील राजकारण वेगळ्या वळणावर गेलेले पाहावयास मिळणार आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या विरोधात सर्व गट तट एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. पूर्वी दोनदा निवडणूक झालेली होती मात्र, विरोधी गटाच्या मत विभागणीचा फायदा सत्ताधारी गटाला झालेला होता. या वेळेला सत्ताधारी गटाच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचे ठरविले असल्याने धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button