शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळा कामगारांचा श्रीपूर येथे रविवारी मेळावा

श्रीपूर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगार लढा कृती समिती यांचे वतीने श्रीपूर मध्ये रविवार २१ सप्टेंबर रोजी श्रीपूर ऊस मळा कामगारांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात श्रीपूर मळ्यातील सर्व शेती महामंडळ, कायम कामगार, रोजंदार कामगार, सेवानिवृत्त कामगार यांना माहिती देण्यासाठी या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी कामगार नेते सुभाष कुलकर्णी, नितीन बेनकर, भिकन शिंदे, भालचंद्र शिंदे पाटील हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशानुसार ज्या कामगारांनी सन 2008-2009 ते 2011-12 या चार वर्षांच्या कालावधीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ज्या रोजंदार कामगारांनी पगार घेतला आहे, अशा रोजंदार कामगारांनी 8.33 टक्के दराने बोनस मिळणार आहे, त्याची माहिती देण्यासाठी तसेच 25/8/2025 रोजी मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री, ना. दत्तात्रय भरणे कृषी मंत्री तसेच योगेश कदम गृहराज्यमंत्री यांच्या उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकारी यांचे बरोबर मंत्रालयात बैठक झाली. त्या बैठकीत दोन गुंठे जागा व घरे बांधून देणे, चौथ्या, पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाचा फरक देणे, रोजंदार कामगारांची मा. न्यायालयीन निर्णयाप्रमाणे ग्रॅच्युइटी देणे इत्यादी विषयांवर चर्चा झाली आहे. याची माहिती देण्यासाठी व शेती महामंडळाने काही कामगारांना घरे खाली करण्यास नोटिसा पाठवल्या आहेत, घरांचे मुल्यांकन शुन्य झाले असताना कामगारांकडून घराचे भाडे घेतले जात आहे, याबाबत व्यवस्थापकीय संचालक यांचे बरोबर चर्चा झाली आहे, त्याची माहिती देण्यासाठी तसेच कामगारांच्या मागण्यासाठी पुणे कार्यालयावर चौदा ऊस मळ्यातील कामगार आंदोलन करणार आहेत.

वरील चार मुद्द्यांची सदर मेळाव्यात चर्चा करण्यासाठी रविवार 21/9/2025 रोजी सकाळी दहा वाजता स्थावर कार्यालय, श्रीपूर, ऊस मळा, दत्त मंदिर, नेवरे रोड, बोरगाव येथे जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी या जाहिर मेळाव्यास श्रीपूर ऊस मळ्याचे सर्व कामगार, महिला कामगार यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन भालचंद्र शिंदे पाटील, राणु शिरगिरे, आबा कांबळे, सर्जेराव साठे, भारत कांबळे, कविता तोरणे, शंकर मोरे, भगवान कांबळे, दिगंबर कदम, विठ्ठल गेजगे, गुलाब शेख, बबन पाटील, तानाजी खपाले, ज्ञानू चांडोले, हरिभाऊ तुरेवाले, नागेश लोंढे, माणिक हाके, सुरेश लोखंडे, सदाशिव पवार, विलास महाडिक, नागू बुरुड यांनी केले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



