Uncategorizedताज्या बातम्या

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढणार का ?

खुडूस ( बारामती झटका )

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाची डोकेदुखी वाढणार का ? अशी राजकीय वर्तुळामध्ये मतदारांचा कानोसा घेतल्यानंतर मतदारांमधून सूर निघत आहे. उमेदवार यादी तयार करीत असताना उमेदवार उभा करताना मतदारांचा विचार घेतला नाही, त्यामुळे प्रत्यक्ष मतदानालासुद्धा आम्हाला विचारात घेऊ नका, अशा मानसिकतेमध्ये मतदार असल्याचे मतदारांच्या बोलण्यावरून जाणवत आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे वर्चस्व कायम होते. दोन वेळा निवडणूक लागली होती. सत्ताधारी गटाच्या विरोधामधील विरोधक यांच्यामध्ये मतभेद व एकमत होत नसल्याने पाठीमागच्या दोन्ही वेळेस विरोधकांचा पराभव झालेला होता. त्यामुळे यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्ताधारी गटातील यंग जनरेशन यांनी नेहमीप्रमाणे मतदारांना बोलावून चर्चा, सल्लामसलत न करता उमेदवार ठरविलेले होते. विरोधी गटाकडून तगडे आव्हान उभे केलेले आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाकडून दोन-तीन उमेदवारांची अदलाबदल विरोधकांचा धस्का घेऊन केलेली आहे. सत्ताधारी गटाचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे. प्रत्यक्ष प्रचाराची सत्ताधारी गटाकडून सुरुवात झालेली आहे. सहकारी सेवा संस्था मतदार संघ व ग्रामपंचायत मतदार संघात सत्ताधारी व विरोधक यांच्यात निकराची लढत होणार असल्याची उमेदवारांवरून स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी गटाने उमेदवार ठरवीत असताना मतदारांना विश्वासात घेतलेले नसल्याने मतदार बरेचसे दुसऱ्या फळीतील नेते व कार्यकर्ते आहेत त्यांच्यामधून सूर निघत आहे. उमेदवार ठरवीत असताना आम्हाला विचारात घेतले नाही, त्यामुळे मतदानाच्या वेळीसुद्धा आम्हाला विचारात घेऊ नका, असा सूर असल्याने सत्ताधारी गटाची डोकेदुखी वाढणार का ?, अशी राजकीय विश्लेषकामध्ये चर्चा सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button