Uncategorized

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील गट भाजप बुद्रुकला सामावून घेणार का ?

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा पॅटर्न अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुनरावृत्ती होणार….

अकलूज (बारामती झटका)

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला असून 27 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात आहे. तर 28 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. सध्या मोहिते पाटील भाजपमध्ये आहेत. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील गट माळशिरस तालुक्यातील मूळ भाजप बुद्रुक गटाला सामावून घेणार का ? अशी चर्चा सुरू आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत स्थानिक आघाडीत समाविष्ट होऊन सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विजयमालक देशमुख यांनी निवडणुकीत वेगळा पॅटर्न राबविलेला होता. त्याचीच पुनरावृत्ती अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुकीचा पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोहिते पाटील भाजपमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे. यामध्ये भाजपमधील मूळ गट असणारे बुद्रुक भाजप यांना निवडणुकीच्या उमेदवारी सामावून घेणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजप बुद्रुक मध्ये ॲड. संजीवनीताई पाटील, राजकुमार पाटील, हनुमंतराव सुळ पाटील, सोपानकाका नारनवर, के. के. पाटील, बाळासाहेब सरगर, भानुदास राऊत, दादासाहेब उराडे, काकासाहेब मोटे, दत्तात्रेय शेळके, अनिल जाधव, सुधीर काळे, बाळासाहेब वावरे, मुक्तार कोरबू, भैय्यासाहेब चांगण, डॉ. अक्षय वाईकर, दादासाहेब खरात, संजय देशमुख, बाळासाहेब शेळके, महादेव कावळे, हनुमंत कर्चे, युवराज वाघमोडे आदी पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्ते आहेत.

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पाठीशी बुद्रुकचे सर्व नेते व कार्यकर्ते पक्षाच्या बाजूने ठाम उभे राहिलेली आहेत. त्यामुळे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बुद्रुक भाजपमधील कार्यकर्त्यांना निवडणुकीत समाविष्ट करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून भाजप सहकार्य करणार का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मोहिते पाटील गटाने जर भाजप बुद्रुक गटाला सामावून घेतले नाही तर गतवेळच्या निवडणुकीमध्ये विरोधी गटाने ग्रामपंचायत मतदार संघात निकराची लढत दिलेली होती. तशीच या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघात व ग्रामपंचायत मतदार संघात चुरशीची रंगतदार निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर माळशिरस तालुक्यातील शिवरत्न मोहिते पाटील गटाच्या विरोधात सर्व विरोधी गट एकत्र येऊन भाजपमधील बुद्रुक गट सामील झाल्यानंतर अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत वेगळे चित्र पहावयास मिळेल, अशी सध्या तरी राजकीय परिस्थिती आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

  1. It’s the best time to make some plans for the future and it’s time to be happy.
    I’ve read this post and if I could I wish
    to suggest you some interesting things or advice. Maybe you could write
    next articles referring to this article. I wish to read
    even more things about it!!

  2. Hey! Do you know if they make any plugins to help with Search Engine Optimization? I’m trying to
    get my website to rank for some targeted keywords but I’m not seeing very good results.
    If you know of any please share. Cheers! You can read similar text here: Blankets

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button